महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी खंडेरायापुढे भंडाऱ्याची उधळण

May 13, 2020, 15:34 PM IST
1/5

संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचं सावट असतानाच आता जनमानसामध्ये या व्हायरसची कमालीची दहशत पाहायला मिळत आहे. पण, यातच जेजुरीनजीकच्या परिसरातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

2/5

जेजुरीतील तो कोरोनाबाधीत रुग्णासह इतरांचे ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि जेजुरी शहरातील तणाव निवळला आहे. 

3/5

जेजुरीसह पुरंदर कोरोनामुक्त राहिल्याने खंडोबा देवाचे नित्य वारकरी, पुजारी सेवेकऱ्यांनी बुधवारी पहाटे जेजुरी गडावर जाऊन मुख्य गाभाऱ्यात कुलदैवत खंडेरायाला भंडाऱ्याचा अभिषेक घातला. फक्त जेजुरीच नव्हे तर, लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा असं  साकडंही खंडेरायाला घालण्यात आलं.

4/5

एप्रिल महिन्यातील ९ तारखेला मार्तंड देव संस्थानच्या डायलिसिस सेंटर मधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल खासगी रुग्णालयाकडून प्राप्त झाला होता. 

5/5

कोरोनाच्या या संसर्गाची माहिती मिळताच जेजुरीसह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली होती. याच धर्तीवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना राबवत जेजुरीतील २९ जणांना क्वारंटाईन केलं होतं. त्यांच्या चाचणीचे अहवाल आता निगेटिव्ह आल्यामुळं पुरंदर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने एक दिलासाच मिळत आहे.