बॉक्स ऑफिसवर परी आणि परिमाणू आमने-सामने...

Jan 20, 2018, 20:22 PM IST
1/6

पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे अनेक चित्रपटांची रिलीट डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यात अनुष्का शर्माच्या परी आणि जॉन अब्राहमच्या परमाणू चित्रपटाचाही समावेश आहे. हे दोन्हीही चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार आहेत.   

2/6

खरंतर अनुष्काचा परी हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र पद्मावतीच्या २५ जानेवारीच्या रिलीट डेटमुळे अय्यारीने आपली रिलीज डेट बदलली आणि आता हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनुष्काने परीचे प्रदर्शन पुढे ढकलत २ मार्चला करण्याचा निर्णय घेतला.   

3/6

अनुष्काच्या प्रॉडक्शनचा हा तिसरा चित्रपट आहे.  क्रिआर्ज एंटरटेनमेंट बॅनरअंतर्गत याचे प्रॉडक्शन करण्यात आले आहे.  

4/6

तर जॉनचा परिमाणू पहिल्यांदा ८ डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र पद्मावत १ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे ही डेट बदलण्यात आली.  

5/6

त्यानंतरही चित्रपटाची रिलीज डेट तिनदा बदलण्यात आली आहे. अखेर हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होईल. या चित्रपटात जॉनसोबत डायना पेंटी देखील प्रमुख भूमिकेत आहे.   

6/6

परी आणि परीमाणू दोन्ही चित्रपट क्रिआर्ज एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत बनवण्यात आले आहेत. आता बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपट आमने-सामने येणार आहेत. मात्र कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.