'तिच्यासाठी कायपण', म्हणत त्यांनी थेट राजघराणं सोडल्याने इंग्लंडचा इतिहासच पालटला; इतिहासाची पुनरावृत्ती

King Edward VIII Marriage Story: अनेक रहस्य आणि त्या रहस्यांतून इतिहासाला आणि भूतकाळातील घटनांना मिळालेली कलाटणी पाहून आजही जग हैराण होतं.   

Dec 12, 2023, 12:11 PM IST

King Edward VIII Marriage Story: ब्रिटनच्या शाही कुटुंबानं कायमच संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. कधी एकेकाळी जगातील अनेक राष्ट्रांवर अधिपत्य असणाऱ्या याच राजघराण्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. 

1/9

अमाप प्रेमापोटी...

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

King Edward VIII Marriage Story: अशा या जगात चर्चा असणाऱ्या ब्रिटनच्या राजघराण्यात एक राजा असाही होता ज्यानं आवडत्या व्यक्तीवर असणाऱ्या अमाप प्रेमापोटी आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी राजघराण्याचे सर्व हक्क एका क्षणात सोडले. 

2/9

हे राजे म्हणजे एडवर्ड आठवे

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

हे राजे म्हणजे एडवर्ड आठवे. अमेरिकेतील घटस्फोटी वालिस सिम्पसन या महिलेच्या प्रेमात ते इतके आकंठ बुडाले की, त्यांनी ब्रिटनचं राजेपणही त्यागलं. 1936 मध्ये एडवर्ड VIII  यांनी सिम्पसन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाय वादळ आलं.   

3/9

संवैधानिक संकट

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

ब्रिटनचा राजा राजघराण्याच्या बाहेरील कुणाही व्यक्तीशी लग्न करू शकत नाही, असा नियम असल्यामुळं तो प्रसंग संवैधानिक संकट म्हणून गणला गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राजे एडवर्ड फ्रान्सस्थित ब्रिटीश लष्कराच्या तुकडीत सेवा देत होते. 

4/9

दुसऱ्या महायुद्धानंतर...

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

फ्रान्सच्या पराजयानंतर त्यांना बहामासचं गव्हर्नरपद देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र एडवर्ड यांनी सिम्पसन यांच्यासोबतच आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित आयुष्य फ्रान्समध्येच व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.   

5/9

राजे एडवर्ड VIII

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

राजे एडवर्ड VIII आणि वालिस सिम्पसन यांना मुलंबाळं नव्हती. उतारवयातही या दोघांनीच एकमेकांना साथ दिली. अखेर 1972 ला फ्रान्समध्येच त्यांन अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारपणानंतर त्यांचं निधन झालं.

6/9

एडवर्ड यांची पत्नी वालिस

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

एडवर्ड यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी वालिस यांची प्रकृती खालावली. जीवनातील अखेरच्या काही दिवसांमध्ये त्यांनी पॅरिसमध्येच एकटेपणात आयुष्य व्यतीत केलं. अंतिम क्षणीसुद्धा त्या एकट्याच होत्या असेही संदर्भ आढळतात.   

7/9

राजेपदाचा त्याग

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

एडवर्ड आठवे यानी राजेपदाचा त्याग केल्यानंतर किंग जॉर्ज सहावे यांना हे पद मिळालं. पुढे जाऊन त्यांच्या पदाचा भार मुलगी प्रिन्सेस एलिझाबेथला मिळाला, जी पुढं राणी एलिझाबेथ द्वितीय म्हणून जगभर नावारुपास आली. 

8/9

अनेकांचा विरोध

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

राजे एडवर्ड आणि वालिस सिम्पसन यांच्या प्रेमकहाणीनं अनेकांचा विरोध सहन केला. काळ पुढं आला आणि याच शाही कुटुंबात इतिहासाची पुनरावृत्ती झाली. 

9/9

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल

King Edward VIII Marriage Story with wallis simpson

प्रिन्स हॅरी यांनी अभिनेत्री मेगन मार्कल हिच्याशी लग्नगाठ बांधली. पण, कौटुंबीक मतभेदांमुळं पत्नी आणि मुलांवरील प्रेमापोटी हॅरी यानीही राजघराण्यासोबतची नाती मागे ठेवत आणि सर्व हक्क सोडत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली.