Kitchen Tips : उन्हाळ्यात स्वयंपाकघर बनतंय आगीची भट्टी? 'या' 5 गोष्टी करून मिळवा घामापासून सुटका

How to keep kitchen cool in summer : मान्सूनचं आगमन व्हायला अजून बरेच दिवस बाकी आहे. उन्हाचा तडाख्या वाढत आहे. अशात महिला असो किंवा पुरुष किचनमध्ये काम करताना घामाने वैतागायला होतं. अन्न शिजवण्यासोबत गरमीने शरीर शिजून निघतं अशी भावना होतं. 

May 22, 2024, 11:38 AM IST
1/8

तुम्हालाही किचनमध्ये गेल्यावर असचं वाटतं. किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला जीवावर येतं. मग आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

2/8

या टिप्स तुम्ही फॉलो केल्यास उन्हाळ्यातही तुमचं किचन थंडगार ठेवण्यास मदत मिळेल. तुमची थोड्याफार प्रमाणात का होईना पण गरमीपासून तुमची सुटका होणार आहे. 

3/8

अनेक घरांमध्ये दुपारी 12 ते 2 दरम्यान किचनमध्ये स्वयंपाक केला जातो. यावेळी सूर्य खूप प्रखर झालेला असतो. त्यामुळे उन्हाळ्यात प्रयत्न करा की, 12 पूर्वी तुम्ही स्वयंपाक करुन घ्या. 

4/8

उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ चांगले नसतात. त्यामुळे किचनमध्ये कमीत कमी वेळ घालविण्यासाठी असे पदार्थ बनवा ज्यात जास्त वेळ लागणार नाही. 

5/8

शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी काय बनवणार आहेत. याची पूर्व तयारी करुन ठेवा. भाज्या कापून ठेवा. ज्यामुळे 12 पूर्वीच तुमचं किचनचं काम पूर्ण होईल. 

6/8

स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन आणि चिमणी नक्की लावून घ्या. धूर, वाफ, तेल आणि मसाल्यांचा वास दूर होईल. शिवाय किचन थंड राहिल. 

7/8

किचनमध्ये शक्य त्या जागेत हिरवी गार झाड असलेले छोटे छोटे रोप लावा. ज्यामुळे वातावरण प्रसन्न आणि थंड वाटेल. 

8/8

किचन खिडक्यांना रंगीबेरंगी प्लास्टिक स्टिकर लावा. जेणे करुन किचनमध्ये असताना उन्ह येणार नाही.