टीम इंडियासाठी गूड न्यूज; Asia Cup साठी 'हा' खेळाडू फीट

टीम इंडियाला जणू दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. मात्र नुकतंच टीम इंडियामध्ये सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह कमबॅक करणार आहे. अशातच आता अजून एक टीम इंडियाचा खेळाडू आशिया कपसाठी फीट असल्याचं म्हटलं जातंय.

Surabhi Jagdish | Aug 04, 2023, 12:11 PM IST
1/5

30 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाचा खेळाडू के.एल राहुल फीट असल्याची माहिती मिळतेय.

2/5

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक आणि वैद्यकीय तज्ञ राहुलच्या रिकव्हरीबाबत समाधानी आहे.

3/5

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के. एल राहुल आशिया कपच्या सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल.

4/5

21 जुलै रोजी, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राहुलने नेटमध्ये फलंदाजी पुन्हा सुरू केली होती. एनसीएमध्ये त्याचा फिटनेसबाबत अभ्यास सुरू आहे.

5/5

यंदाच्या आयपीएलमध्ये के.एल राहुलला फिल्डींगदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.