'त्याला' पराभूत करण्यासाठी लक्ष्मणाला घ्यावी लागली हनुमानाची मदत; हा अतिकाय होता तरी कोण?

Ramayan Intresting Facts Who Was Atikay: तुम्हाला रामायणामधील अतिकाय कोण होता हे ठाऊक आहे का? ज्याचा वध करण्यासाठी लक्ष्मणाला थेट हनुमानाची मदत घ्यावी लागली होती. जाणून घ्या कोण आहे रामायणामधील ही व्यक्ती आणि अखेर तिचा वध कसा झाला.

| Jun 27, 2024, 15:30 PM IST
1/10

Ravana Son Atikay

रावणाचा पुत्र अतिकाय हा फार शक्तीशाली आणि क्रूर होता. अतिकाय एक उत्तम योद्धा होता. आपल्या वडिलांप्रमाणे अहंकारी असलेला अतिकायचा वध लक्ष्मणाने केला.  

2/10

Ravana Son Atikay

अतिकाय हा रावणाला त्याची दुसरी पत्नी दाम्यमालिनीपासून झाला होता. मागील जन्मी अतिकाय हा कैटव नावाचा दैत्य होता. कैटवचा वध स्वत: प्रभू नारायणाने केला होता.  

3/10

Ravana Son Atikay

आपल्या पूर्वजन्मी अतिकाय जेवढा शक्तीशाली होतात तितकाच दुसऱ्या जन्मातही तो शक्तीशाली होता.   

4/10

Ravana Son Atikay

अतिकायने ब्रम्हदेवाला तपस्य करुन त्यांच्याकडून एक ब्रम्हकवच मिळवलं होतं. दिव्य शस्त्रांच्या हल्ल्यांपासून या कवचामुळे अतिकायचं संरक्षण व्हायचं.  

5/10

Ravana Son Atikay

शक्ती आणि ब्रम्हकवचाच्या मदतीने अतिकाय कोणालाही पराभूत करु शकत होता.  

6/10

Ravana Son Atikay

रामायणाच्या युद्धात जेव्हा रावणाच्या सेनेनं प्रभू श्री रामांच्या सेनेला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्ष्मण आणि अतिकाय यांचं युद्ध झालं. मात्र यात अतिकायचा पराभव झाला नाही.  

7/10

Ravana Son Atikay

त्यावेळेस हनुमानाने लक्ष्मणाला मदत करण्याचा निर्णय घेतला. हनुमान लक्ष्मणाला खांद्यावर बसवलं आणि हवेत झेप घेतली.   

8/10

Ravana Son Atikay

हनुमानाने अतिकायवर ब्रम्हास्र चालवलं. हे ब्रम्हास्र अतिकायच्या ब्रम्ह कवचाला भेदून गेलं आणि अतिकायचा मृत्यू झाला.  

9/10

Ravana Son Atikay

राम-रावणाच्या युद्धात अतिकायचा मृत्यू एक महत्त्वाचा टप्पा होता. अतिकायच्या मृत्यूने रावणाची सेना कमकुवत झाली आणि रामाच्या विजयाची शक्यता वाढली.  

10/10

Ravana Son Atikay

डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.