सर्वात मोठी Income Tax धाड! 36 मशिन्सने 10 दिवस मोजल्या नोटा, ट्रकने..; सापडलेली एकूण रक्कम..

Biggest Income Tax Raid In India: तुम्ही आयकर विभागाच्या धाडींबद्दल अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल मात्र भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालेली धाड कोणती होती माहितीये का? या धाडीत सापडलेले पैसे किती होते हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...  

| Dec 01, 2024, 10:58 AM IST
1/8

itraid

तुमचा विश्वास बसणार नाही पण तब्बल 10 दिवस ही धाड सुरु होती. या धाडीमध्ये नेमकं काय काय सापडलं जाणून घ्या...

2/8

itraid

आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या कायमच चर्चेचा विषय ठरतात. वेगवेगळ्या कारणांसाठी या धाडी टाकल्या जातात. मात्र देशात टाकण्यात आलेल्या आयकर धाडींपैकी सर्वात मोठी धाड कोणती माहितीये का? हा धाडीमध्ये एवढी रोख रक्कम सापडली होती की नोटा मोजणाऱ्या मशीन हँग झाल्याने अधिकाऱ्यांनी स्वत: धाड टाकलेल्या ठिकाणी बसून पैसे मोजले होते. 

3/8

itraid

भारतात पडलेली सर्वात मोठी आयकर धाड ही ओडिशामध्ये पडली होती. ही धाड तब्बल 10 दिवस सुरु होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अनेक विभागांवर धाडी टाकल्या होत्या. बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपीनमध्ये हा छापा टाकण्यात आला होता.   

4/8

itraid

बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर टाकलेल्या छाप्यामध्ये 352 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. ही कारवाई 10 दिवस सुरु होती.   

5/8

itraid

या धाडीमध्ये सापडलेला पैसा एवढा होता की जमिनी खाली गाडून ठेवलेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी आयकर विभागाने चक्क चाकं असलेल्या स्कॅनिंग मशिन्सचाही वापर केला होता. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. 

6/8

itraid

या छाप्यादरम्यान सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी आयकर विभागाने तब्बल तीन डझन नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या होत्या. वेगवेगळ्या बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोटा मोजण्याचं काम करण्यात आलं. यापैकी अनेक मशीन बंद पडल्याने अधिकाऱ्यांनी स्वत: बसून नोटा मोजल्या.

7/8

itraid

नोटा मोजल्यानंतर त्या चक्क ट्रकमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये आयकर विभागाच्या कार्यालयामध्ये नेण्यात आल्या होत्या.  

8/8

itraid

याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र सरकारने ओडिशात टाकलेल्या या धाडींमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक करत गौरव केला. या धाडींचं नेतृत्व आयकर विभागाचे निर्देशक एस के. झा आणि अतरिक्त निर्देशक गुरप्रीत सिंग यांनी केलं. (फाइल/प्रातिनिधिक फोटो)