T20 WC 2022 स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणारे टॉप 5 बॅटर, जाणून घ्या

T20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. उपांत्य फेरीचं संपूर्ण गणित जर तर वर अवलंबून आहे. असं असताना या स्पर्धेत काही विक्रमही नोंदवले गेले आहेत. काही खेळाडूंनी उत्तुंग षटकार ठोकले आहेत. चेंडू तटावताना इतकी ताकद होती की सीमारेषेपार 100 मीटरहून लांब मारला आहे.

Nov 03, 2022, 22:32 PM IST

T20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. उपांत्य फेरीचं संपूर्ण गणित जर तर वर अवलंबून आहे. असं असताना या स्पर्धेत काही विक्रमही नोंदवले गेले आहेत. काही खेळाडूंनी उत्तुंग षटकार ठोकले आहेत. चेंडू तटावताना इतकी ताकद होती की सीमारेषेपार 100 मीटरहून लांब मारला आहे.

1/5

T20 World Cup 2022, UAE Junaid Suddique

यूएईच्या जुनैद सुद्दीकने या स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारला आहे. टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेज फेरीत गीलॉन्ग येथे श्रीलंकेच्या दुष्मंथा चमेराच्या गोलंदाजीवर 109 मीटर षटकार मारला. हा T20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा षटकार आहे.  (Image source: Instagram)

2/5

T20 World Cup 2022, Pakistan Iftikhar Ahmed

सुपर 12 फेरीत पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सर्वात लांब षटकार मारला.  लुंगी एनगिडीनं टाकलेला चेंडू मैदानाबाहेर तटावला. त्याने 106 मीटर अंतरावर चेंडू मारला.  

3/5

T20 World Cup 2022, West Indies Odean Smith

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथने आयर्लंड विरुद्ध 106 मीटर लांब षटकार मारला. मात्र असं असलं तरी स्पर्धेत टिकून राहण्याचं वेस्ट इंडिजचं स्वप्न भंगलं आहे. (Image source: Instagram)

4/5

T20 World Cup 2022, South Africa David Miller

दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. मिलरला किलर म्हणून ओळखलं जातं. भारताविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. या डावात त्याने 104 मीटर लांब षटकार ठोकला होता. (Image source: Twitter)  

5/5

T20 World Cup 2022, West Indies Powell

वेस्ट इंडिजचं या स्पर्धेतील आव्हान ग्रुप स्टेजमध्ये संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी पॉवेलनं झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात मारलेला षटकार सर्वांच्या लक्षात राहिला. हा षटकार 104 मीटर लांब मारला होता.  (Image source: Twitter)