शरिरातील किती टक्के पाणी कमी झाल्यास होऊ शकतो मृत्यू; जाणून घ्या पाण्याबद्दल काही रंजक गोष्टी

प्रत्येक वर्षी 22 मार्चला 'जागतिक पाणी दिवस' साजरा केला जातो. यानिमित्ताने पाण्यासंबंधी काही रंजक गोष्टी समजून घ्या.   

Mar 22, 2024, 15:19 PM IST

प्रत्येक वर्षी 22 मार्चला 'जागतिक पाणी दिवस' साजरा केला जातो. यानिमित्ताने पाण्यासंबंधी काही रंजक गोष्टी समजून घ्या. 

1/10

प्रत्येक वर्षी 22 मार्चला 'जागतिक पाणी दिवस' साजरा केला जातो. यानिमित्ताने पाण्यासंबंधी काही रंजक गोष्टी समजून घ्या.   

2/10

पृथ्वीवर जवळपास 72 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.   

3/10

पण पृथ्वीवर 97 टक्के पाणी खारं आहे, म्हणजेच पिण्यायोग्य नाही. उर्वरित 2 टक्के पाणी हिमशखर आणि हिमनद्यांमध्ये आहे.   

4/10

म्हणजेच आपल्या गरजा पूर्ण कऱण्यासाठी फक्त 1 टक्के पाणी उपलब्ध आहे.   

5/10

पाणी हा पृथ्वीवरील एकमेव पदार्थ आहे जो नैसर्गिकरित्या द्रव, घन आणि वायू या तिन्हींमध्ये आढळतो.  

6/10

पाणी गोठल्यानंतर त्याचा आकार 9 टक्क्यांनी वाढतो. याचमुळे बर्फच्छादित प्रदेशात पाण्याचे पाईप फुटतात.   

7/10

नासाला चंद्रावरही पाणी आढळलं आहे. पण हे पाणी फक्त बर्फाच्या रुपात उपलब्ध आहे.   

8/10

काही स्थितींमध्ये गरम पाणी गार पाण्याच्या तुलनेत वेगाने गोठते. या वैज्ञानिक घटनेला पेम्बा प्रभाव म्हटलं जातं.   

9/10

माणूस पाण्याविना फक्त एक आठवडाच जगू शकतो. अंटार्टिकामध्ये पृथ्वीचं 90 टक्के ताजं पाणी उपलब्ध आहे.   

10/10

माणसाच्या शरिरात 1 टक्के पाणी कमी झाल्यास तहान लागते. तसंच 8 टक्के पेक्षा कमी पाणी झाल्यास मृत्यू होऊ शकतो.