तुमच्या या आवडत्या बॉलिवूड स्टार्सचं शिक्षण किती तुम्हाला माहितीये?

Apr 20, 2020, 12:18 PM IST
1/9

शिक्षण कमी असलं तरी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले स्टार्स

शिक्षण कमी असलं तरी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले स्टार्स

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी आज खूप नाव कमवलं आहे. आज आपण कॅटरीना कैफ, आमिर खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, करीना कपूर, काजोल, करिश्मा कपूर आणि सलमान खान या यशस्वी स्टार्सचं शिक्षण जाणून घेणार आहोत.

2/9

कॅटरीना कैफ:

कॅटरीना कैफ:

मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅटरीना कैफने हायस्कूल पर्यंत शिक्षण घेतलं आहे. कमी वयातच तिने मॉडलिंा सुुरुवात केली. ज्यामुळे तिला शिक्षण मध्येच सोडावं लागलं.

3/9

आमिर खान:

आमिर खान:

आमिर खान बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. अभिनयाबरोबरच सामाजिक भान तो जपतो. आमिरने नारसी मुंजे कॉलेजमधून 12 पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

4/9

अक्षय कुमार:

अक्षय कुमार:

बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारने खालसा कॉलेजमध्ये ग्रॅज्यूएशनसाठी प्रवेश घेतला. पण बँकॉकमध्ये मार्शल आर्ट शिकण्यासाठी त्याने शिक्षण सोडून दिलं.

5/9

दीपिका पादुकोण:

दीपिका पादुकोण:

दीपिका पादुकोण आज बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. मॉडलिंगची ऑफर मिळाल्यानंतर दीपिकाने देखील ग्रॅज्युएशन मध्येच सोडून दिलं.

6/9

करीना कपूर:

करीना कपूर:

करीना कपूरने 20 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे सिनेमांमुळे तिने ग्रॅज्युएशन मध्येच सोडून दिलं.

7/9

काजोल:

काजोल:

काजोलने बॉलीवुडमध्ये खूप काम केलं आणि सुपरहिट सिनेमे देखील दिले. आज देखील तिची जादू कायम आहे. काजोलने वयाच्या 17 व्या वर्षी बॉलीवुडमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षण तिने मध्येच सोडून दिलं.

8/9

करिश्मा कपूर:

करिश्मा कपूर:

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूर वयाच्या 16 व्या वर्षी सिनेमात काम करु लागली. ज्यामुळे तिने शिक्षण पूर्ण केलं नाही.

9/9

सलमान खान:

सलमान खान:

सलमान खान बाबत नेहमी एक चर्चा आहे की, त्याने ग्रॅज्यूएशन केलं आहे. पण काही कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडून दिलं.