महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं चमत्कारिक मंदिर! त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो चंद्र
महाराष्ट्रातील 900 वर्ष जुन मंदिर आजही संशोधकांना कोड्यात टाकत आहे. या मंदिराची रचना थक्क करणारी आहे.
Kolhapur Kopeshwar Mandir Khidrapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या जवळ असलेले कोपेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला अद्भूत नजारा पहायला मिळतो. कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग असे चमत्कारिक दृष्य पहायला मिळते. हे मंदिर स्थापत्य केलेचा अद्धभूत नमुना मनाले जाते. 108 खांबावर उभ्या असेलल्या या मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास करुन या मंदिराची रचना करण्यात आली.





