कोपरगाव दिवाळी फेस्टिव्हल; सूर्यतेज दीपावली पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

कोपरगाव येथे रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. आकर्षक रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Nov 14, 2023, 21:32 PM IST

diwali 2023 : कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत  याही वर्षी  दीपावली-पाडवा निमित्त 'घर तेथे रांगोळी' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो स्पर्धकांनी सहभागी होवून घरोघरी रांगोळी साकारल्या आहेत.

1/11

यंदाचे हे अकरावे वर्ष असून सुशांत घोडके हे सूर्यतेज संस्थेचे संस्थापक आहेत. 

2/11

दिवसेंदिवस लोप पावत चाललेले सण-उत्सव-परंपरा उर्जित ठेवण्यासाठी सूर्यतेज संस्थेनेे घर तेथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

3/11

या स्पर्धेत मुली-महिलासह तरुण पुरुषांनीही लक्षणीय सहभाग घेतला.

4/11

या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असल्याने गरीब सर्व सामन्यांच्या दारापासून ते बंगल्याच्या गच्ची पर्यंत सर्व स्तरावरचा सहभाग हा स्पर्धेचा मानबिंदू ठरला आहे.

5/11

ठिपके, संस्कार भारती,प्रबोधन,विविध निसर्ग व मानव निर्मित वस्तूंचा वापर करून तयार केलेली रांगोळी आणि कृष्णधवल रंगसंगती पासून सप्त रंगांची मुक्त उधळण केलेली रांगोळी मूळे रांगोली स्पर्धा वैशिष्ट्य पूर्ण ठरली आहे.

6/11

कोपरगावातील रांगोळी कलेत छोटया छोटया कलाकारांमध्ये दडलेले पैलू या निमित्त पहावयास मिळाले.

7/11

नियोजन आणि व्यवस्थापनशास्त्र मध्ये ही रांगोळी स्पर्धा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट समजली जाते.  

8/11

स्पर्धेनिमित्त कोपरगावातील छोटया- छोटया रांगोळी विक्रेत्यांची मोठी विक्री झाली आहे. 

9/11

प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,यांचे वतीने देण्यात येणार आहे.

10/11

 घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व समावेशक करण्यासाठी बंदिस्त कार्यालय , रांगोळीचा ठराविक आकार, रंग संगती यांचे बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपरिक,निसर्गचित्र, व्यक्तीचित्र,सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.  

11/11

शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम घरापुढे रांगोळी काढण्याची भारत वर्षात मोठी परंपरा आहे.६४ कला प्रकारामध्ये रांगोळी कलेला महत्व आहे.