Bank FD Interest Rate 2023: एफडी सुरु करण्याआधी पाहा कोणती बँक देतेय किती टक्के व्याज

Bank Fixed Deposit Interest Rate  : हल्ली जवळपास सर्वच बँकांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. पण, यातूनही नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? पाहा ही माहिती...   

Jun 08, 2023, 15:19 PM IST

Bank FD Interest Rate 2023 : कुठेही गुंतवणूक करण्याचा मुद्दा जेव्हा उपस्थित केला जातो त्यावेळी व्याजदर किती मिळणार हा पहिलाच प्रश्न उपस्थित केला जातो. ती एखादी पतसंस्था असो किंवा मग एखादी खासगी अथवा सरकारी बँक. व्याजदर महत्त्वाचा. 

1/8

येस बँक

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

येस बँकेत सर्वसामान्यांसाठी एफडीवर 3.25 ते 7.50 टक्के इतकं व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रमाण 3.75 ते 8.25 टक्के इतकं आहे.   

2/8

युनियन

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

युनियन बँकेत सामान्य खातेधारकांना एफडीवर 3 ते 7 टक्के व्याज मिळतं. तर, ज्येष्ठांसाठी हे प्रमाण 3.50 ते 7.50 टक्के इतकं आहे.   

3/8

कॅनरा

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

कॅनरा बँकेत नागरिकांना एफडीवर 4 टक्के व्याज मिळतं. हे प्रमाण 7.25 टक्के व्याजदरापर्यंत असून, ज्येष्ठांसाठी कमाल व्याजदर 7.75 टक्के इतका आहे.   

4/8

अॅक्सिस

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

अॅक्सिस बँकेतही इतर बँकांप्रमाणे एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण 3.50 ते 7.85 टक्के इतकं आहे.   

5/8

PNB

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असणाऱ्या PNB बँकेत एफडीवर 3.5 ते 7.25 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 टक्के व्याज दिलं जातं.   

6/8

icici

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

icici बँकमध्ये एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज दिलं जातं.   

7/8

HDFC

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

अनेकांच्याच पगाराची खाती असणाऱ्या HDFC या बँकेत एफडीवर सामान्य नागरिकांना 3 ते 7.25 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज मिळतं. 

8/8

SBI

Fixed Deposit Interest Rate sbi icici union bank marathi news

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI मघ्ये एफडीवर 3 ते 7.10 टक्के इतकं व्याज दिलं जातं. ज्येष्ट नागरिकांसाठी हा दर 3.50 ते 7.60 टक्के इतका आहे.