दुसऱ्या टप्प्यात देशात 64.24 टक्के मतदान, पाहा महाराष्ट्र किती टक्के?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 13 राज्यातील 88 जागांवर मतदान झालं. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश होता. देशाच्या  तुलनेत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात देखील कमी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

| Apr 26, 2024, 21:01 PM IST
1/7

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान पार पडलं. देशातील 13 राज्यातील 88 लोकसभा जागांवर मतदारांनी मतदान केलं. या टप्प्यात राहुल गांधी, हेमा मालिनी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

2/7

दुसऱ्या टप्प्यात 1206 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं. या टप्प्यात 16 कोटी मतदार होते, त्यांच्यासाठी 1 लाख 67 हजार मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथे मतदान करण्यात आलं.

3/7

दुसऱ्या टप्प्यात देशात 64.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं.  त्रिपुरात  76.2  तर मणिपूरमध्ये  76.1 टक्के मतदान पार पडलं. केरळात 67 टक्के मतदानाची नोंद झाली. तर छत्तीसगडेही मतदानाचा उत्साह दिसला. इथे 72.1 टक्के मतदान झालं.

4/7

याशिवाय आसाम 70.68%, बिहार 54.17%, छत्तीसगढ 72.51%, जम्मू आणि कश्मीर 67.22%, कर्नाटक 64.57%, केरल 65.04%, मध्य प्रदेश 55.32%, महाराष्ट्र 53.71%, मणिपुर 77.18%, राजस्थान 60.06%, त्रिपुरा 77.97%, उत्तर प्रदेश 53.17% आणि पश्चिम बंगाल 71.84% मतदान झालं आहे. 

5/7

राज्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झालं. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर सर्वात कमी मतदान हिंगोलीत झालंय.  वर्धा  56.6%, अकोला 52.49%, अमरावती 54.50%, बुलडाणा  52.24%, हिंगोली 52.03%, नांदेड 52.47%, परभणी 53.79%, यवतमाळ-वाशिम 54.04% मतदानाची नोंद झालीय.

6/7

देशात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 लोकसभा जागांवर हे मतदान पार पडलं. यात कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रत प्रत्येकी 8, मध्य प्रदेशमध्ये 6, असम आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ प्रत्येकी 3 , त्रिपुरात 1, आणि जम्मू-कश्मीरमधील दोन लोकसभा जागांचा समावेश होता.

7/7

पहिल्या टप्प्यात 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. तर मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा 1 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात 7, 13 आणि 20 मे रोजी उर्वरीत तीन टप्प्यात मतदान होणार आहे. चार जूनला मतमोजणी होणार आहे.