Budget कमी पण कमाई ब्लॉकबस्टर! 'या' 8 चित्रपटांनी कमी पैशांतही कमावले कोट्यवधी रूपये...

सध्याचा जमाना आहे तो लो बजेट फिल्म्सचा कारण आजकाल लोकांना हायफाय सेट्स पेक्षा किंवा खर्चिक कमर्शियल एक्शन मसालापटांपेक्षा साधे, फॅमिलीपट आणि आशयपुर्ण (Content Films) चित्रपट आवडत आहेत. त्यामुळे या वर्षी लो बजेट चित्रपटांना प्रेक्षकांना चांगली पसंती दिली आहे. यावर्षीही असेच काही लो बजेट चित्रपट बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनवर हीट ठरले आहेत. तेव्हा पाहूया ते सिनेमे कोणते? 

Dec 17, 2022, 21:41 PM IST

Low Budget Films 2022: सध्याचा जमाना आहे तो लो बजेट फिल्म्सचा कारण आजकाल लोकांना हायफाय सेट्स पेक्षा किंवा खर्चिक कमर्शियल एक्शन मसालापटांपेक्षा साधे, फॅमिलीपट आणि आशयपुर्ण (Content Films) चित्रपट आवडत आहेत. त्यामुळे या वर्षी लो बजेट चित्रपटांना प्रेक्षकांना चांगली पसंती दिली आहे. यावर्षीही असेच काही लो बजेट चित्रपट बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनवर हीट ठरले आहेत. तेव्हा पाहूया ते सिनेमे कोणते? 

1/7

777 चार्ली

777 Charlie

किरणराज के दिग्दर्शित 777 चार्ली या चित्रपटाने 17 कोटींच्या बजेटमध्ये 105 कोटींची कमाई केली. 

2/7

मेजर

Major

26/11 च्या मुंबई हल्ल्यात मोलाची कामगिरी दिलेल्या मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात आदि विशेष आणि सई मांजरेकर यांच्या प्रमुख भुमिका होत्या. या चित्रपटाचेही बजेट 25 कोटी रूपये एवढे होते तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 66 कोटींची कमाई केली होती. 

3/7

लव्ह टूडे

Love Today

महिन्याभरापुर्वीच प्रदर्शित झालेल्या लव्ह टूडे या चित्रपटानं अल्पवधीचं खूप कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 5 कोटी असून कमाई 70 कोटी रूपये आहे. 

4/7

सरदार

sardar

दाक्षिणात्त्य सिनेमा सरदार दोन महिन्यांपुर्वी दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेटही 20 कोटी होते परंतु या चित्रपटानं 104 कोटी कमावले आहेत. हा चित्रपटही अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. 

5/7

कार्तिकेय 2

Kartikeya 2

कार्तिकेय 2 हा चित्रपटही ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेते अनुपम खेर यांचीही यात भुमिका होती. या चित्रपटाचे बजेट 15 कोटी इतके होते परंतु या चित्रपटाने 125 कोटी इतकी कमाई केली. 

6/7

कांतारा

Kantara

या वर्षीचा सर्वात सुपरहीट आणि गाजलेला सिनेमा म्हणजे कांतारा. या चित्रपटाची यावर्षी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. या चित्रपट भारतात तसेच भारताबाहेरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे बजेट 16 कोटी होते तर कमाई 393 कोटी एवढी होती. 

7/7

सीता रामम

sita ramam

सीता रामम हा चित्रपट यावर्षी 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. हा तेलुगू चित्रपट असून या चित्रपटात डाक्लर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भुमिका होत्या. या चित्रपटाचं बजेट 30 कोटी असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 92 कोटी कमावले आहेत.