ई-शिवनेरीमुळे Mumbai-Pune प्रवास आता होणार आणखी स्वस्त, किती असेल तिकीट? जाणून घ्या सर्व Details

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (State Transport) ताफ्यात ई-शिवनेरी (E Shivneri) दाखल झाली असून आता मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवास आणखी स्वस्त होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ST ला आता ७५ वर्ष पूर्ण होत असताना परिवहन मंडळात मोठे बदल होताना दिसत आहेत.   

May 01, 2023, 16:55 PM IST
1/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी दाखल झाली आहे. महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले.  

2/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

यामुळे मुंबई-पुणे प्रवास आता आणखी स्वस्त होणार आहे. (Photo: Twitter/@transit_of_pune)    

3/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

ई-शिवनेरीचा तिकीट दर इतर शिवनेरी बसच्या तुलनेत कमी असणार आहे. यामुळे नेहमी शिवनेरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   

4/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

सध्या मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी शिवनेरी 515 रुपये तिकीट आकारत आहे. ई-शिवनेरीत हा तिकीट दर 415 ते 445 रुपये असणार आहे.   

5/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

या बसमध्ये एकूण 43 प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.   

6/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

यासह बसमध्ये आरामदायक सीट, मोबाइल चार्जिंग आणि लाईटची सुविधा असेल. तसंच बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.   

7/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही बस तब्बल 300 किमी धावेल. (Photo: Twitter/@transit_of_pune)    

8/8

मुंबई-पुणे प्रवास आता इलेक्ट्रिक शिवनेरीमधून

या ST चा इतिहास ७५ वर्षाचा होतोय. आपल्या परिवहन सेवेचा कणा ही गुणवत्ता पूर्वक करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे यांना एसटीचं दूत नेमण्यात आलं असून, आपल्यातला माणूस नेमल्याचं समाधान असल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे.