Supriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय. 

Jun 04, 2024, 18:31 PM IST
1/8

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी झाला आहे.  राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत. 

2/8

राजकारणात थेट संसदेतून सुरुवात करणाऱ्या सुप्रिया सुळे चौथ्यांदा दिल्लीतील महाराष्ट्रातील प्रश्न मांडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या काळात शरद पवारांची लेक एवढंच ओळख त्यांनी आज मिटवली आहे. 2006 मध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला आले. त्यावेळी बाळासाहेब यांनी सुप्रिया सुळे यांना थेट केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला. 

3/8

सुप्रिया सुळे यांना केंद्रा पाठवण्यासाठी बाळासाहेबांनी कमळाबाईला पटवलं आणि सुप्रिया सुळे यांना बिनविरोध विजय मिळाला. तेव्हापासून महाराष्ट्रातील जनतेसाठी सुप्रिया सुळे पवारांच्या लेक नाही तर सुप्रिया ताई त्यांच्या सुख दु:खात उभ्या राहणारा एक कुटुंबातील सदस्य झाल्या. 

4/8

राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी प्रथम तरुणींशी जोडण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची उभारणी केली. यामाध्यमातून त्यांनी राज्यात होणाऱ्या स्त्री-भ्रूण हत्यांविरोधात एल्गार पुकारला. 

5/8

सुप्रिया सुळे सर्वसामान्यांमधील एक असतात. आषाढी वारी असो, किंवा कुठला घरगुती कार्यक्रम ताई कायम तिथे असतात. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्या राजकीय प्रवास करत आहेत. 

6/8

सुप्रिया सुळे यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतील जय हिंद महाविद्यालायतून सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) त्यांनी पदवी घेतली. पण त्यानंतर यांचं सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर त्या कॅलिफॉर्नियात गेल्या. तिथेही त्यांनी जल प्रदूषण या विषयावर अभ्यास केला. 

7/8

शरद पवार राजकारणातून निवृत्ती होणार असं घोषणा झाली आणि त्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद मिळणार अशी चर्चा रंगली होती. कदाचित याच नाराजीतून अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया यांची साथ सोडली. 

8/8

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळीचा एक फोटो खूप चर्चेत आला होता. ज्यामध्ये शरद पवार पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आल्यानंतर ते खुर्चीवर बसून आपले बूट घालत होते. त्यावेळी या थकलेल्या वडिलांना लेक सुप्रिया सुळे यांनी बूट घालण्यासाठी मदत केली. यावेळी राजकीय नेत्या नाही त्यांच्यामधील आदर्श आणि मायेची सावली असणारी लेक दिसून आली.