स्कायरुफ, 6 Airbags, ADAS अन्... महिंद्राची नवी धमाकेदार कार! किंमत फक्त 7.49 लाख; पाहा फिचर्स
Mahindra XUV 3XO Price Features Specifications: ज्या प्राइज रेंजमध्ये महिंद्राने आपली नवीन गाडी बाजारात उतरवली आहे ते पाहता ही गाडी नक्कीच अनेक एक्सयुव्ही गाड्यांना तगडं आव्हान देणार असं स्पष्ट होत आहे. या गाडीचे एकूण 6 व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. एकूण 8 रंगसंगतीमध्ये ही कार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जाणून घेऊयात या कारची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स...
Swapnil Ghangale
| Apr 30, 2024, 09:49 AM IST
1/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733933-xuv3xo4.jpg)
2/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733932-xuv3xo14.jpg)
'एक्सयूव्ही थ्री एक्स ओ'च्या एमएक्स वन मॉडेलची किंमत अवघ्या 7 लाख 49 हजारांपासून (एक्स-शोरुम प्राइज) सुरु होत आहे. या गाडीच्या टॉप-एण्ड एएक्स सेव्हन एल मॉडेलची किंमत 13 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरुम प्राइज) इतकी आङे. कंपनीने या गाडीसाठीची बुकिंग सुरु केली आहे. लवकरच या गाडीची डिलीव्हरीही सुरु केली जाणार आहे.
3/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733931-xuv3xo1.jpg)
4/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733930-xuv3xo2.jpg)
5/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733929-xuv3xo11.jpg)
XUV 3XO च्या अंतर्गत भागांमध्ये कोणतेही बदल नाहीत. XUV400 EL Pro (EV) मध्ये असेच इंटिरिअर पाहायला मिळालेलं. XUV 3XO मध्ये 10.25 इंचांची प्रि-स्टॅण्डिंग इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यात वायरलेस एण्ड्रॉइड, अॅपल कार प्ले सुविधा देण्यात आली आहे. एड्रेनॉक्स कनेक्टिव्हिटी, 10.2 इंचांची फूल डिजीटल टीएफटी इन्स्ट्रूमेंट स्क्रीन, ऑडिओ सिस्टीम देण्यात आला आहे.
6/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733928-xuv3xo7.jpg)
XUV700 पेक्षा सरस स्टेअरिंग व्हील, रियर एसी व्हेंट, रियर यूएसबी पोर्ट, वायरलेस चार्जिंग, ब्लाइंड-व्हू मॉनिटरिंग 360 डिग्री कॅणेरा आणि लेव्हल 2 ADAS सिस्टीम देण्यात आली आहे. भारतामध्ये बी सेगमेंट वाहनांमध्ये लेव्हल-2 ADAS दिलं जातं. यामध्ये 10 वैशिष्ट्ये आहेत. ADAS हे सुरक्षा यंत्रणेचा एक प्रकार आहे.
7/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733927-xuv3xo12.jpg)
8/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733926-xuv3xo10.jpg)
कारमध्ये ड्युअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ देण्यात आला आहे. याला कंपनीने स्कायरुफ असं म्हटलं आहे. यात ड्युएल-झोन क्लाइमेट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. यासाठी प्रोजेक्टर एलीमेंटबरोबर ऑल-एलईडी लाइटिंग, लेदरेट अपहोल्स्ट्री, फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट, कूल्ड ग्लोवबॉक्स, ऑटो-डिमिंग IRVM, ऑटो हेडलाइट्स, रेन-सेंसिंग वाइपर आणि बऱ्याच गोष्टी देण्यात आल्या आहेत.
9/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733925-xuv3xo8.jpg)
10/11
![Mahindra XUV 3XO Price Features Specifications](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733924-xuv3xo9.jpg)