महिलाच नव्हे, पुरुष देखील घेऊ शकणार प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी Male Pill

Dec 30, 2020, 14:14 PM IST
1/5

वैज्ञानिक यावर 25 वर्षांपासून संशोधन करतायत. आता हे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.  

2/5

याआधी देखील वैज्ञानिकांनी हे मेडिसिन लवकर बाजारात आणण्याबद्दल म्हटलं होतं. पण आता नव्या वर्षात हे मेडिसिन येईल. यामध्ये जेल, गोळ्या, मासिक इंजेक्शनचा समावेश आहे.  

3/5

वैज्ञानिकांनी पहिल्यांदा 1950 मध्ये MALE Pill बनवण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकी कंपनी स्टर्लिंग Anti Parasite Medication तयार करत होती.  

4/5

यावेळी टेस्टमधून धक्कादायक खुलासे समोर आलेयत. तयार केल्या गेल्या औषधाचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला. तेव्हा उंदरांच्या प्रजननाची ताकद कमी झाल्याचे दिसले. पुरुषांवर याचा प्रयोग केल्यानंतर स्पर्मची ( Sperm ) संख्या कमी झाल्याचे आणि त्यानंतर भयानक परिणाम समोर आले. यानंतर औषधाचे उत्पादन थांबवण्यात आलं.

5/5

सध्या कंडोम  (Condom) हे गर्भनिरोधासाठी सुरक्षित पद्धत मानली जाते. बाजारात पुरुषांव्यतिरिक्त महीलांसाठी कंडोम  (Female Condom) देखील उपलब्ध आहे. कंडोमच्या योग्य वापरामुळे गर्भ निरोधाचे प्रमाण 98 टक्क्यांपर्यंत आहे. प्रत्येकवेळी नव्या कंडोमचा वापर करणं गरजेचं आहे.