मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात! अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

मराठमोळी अभिनेत्री आणि डान्सर मानसी नाईकला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मानसी नाईक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याशिवाय तिचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. आता मानसीनं घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं सांगितलं आहे. 

| Mar 24, 2024, 17:41 PM IST
1/7

मानसीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

2/7

मानसी नाईकनं नुकतीच अमृता फिल्मला मुलाखत दिली. यावेळी मानसीनं तिच्या खाजगी आयुष्याविषयी भाष्य केलं आहे. मानसीनं तिला तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं सांगितलं आहे. 

3/7

मानसी यावेळी म्हणाली की "आता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. आता पुढचा प्रवास हा स्त्री म्हणून करायचा आहे. माझा हा जन्म मला वाया घालायचा नाही. हे मी मनाशी ठरवलंय."

4/7

आयुष्यात पुढे जाण्याविषयी मानसी म्हणाली, "अडचणी येतच नाहीत असं कोण म्हणतं, त्या आल्या की हॅलो बोलायचं आणि जायच्या वेळी बाय म्हणायचं." 

5/7

प्रेम म्हणजे काय हे सांगत मानसी म्हणाली, "प्रेम हे खूप छान असतं आणि माझ्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचं आहे. जगात अनेक गोष्टींच्या प्रेमात आपण असतो, पण मी स्वत:च्या प्रेमात आहे. "

6/7

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा हे 19 जानेवारी 2021 रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या काही महिन्यातच ते विभक्त झाले.

7/7

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या दोन गाण्यांमुळे मानसीला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.