PHOTO:आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक्

Mango Seeds Benefits : आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही पण कोय फेकून देता? मग थांबा कोलेस्ट्रॉलसह 'या' 5 गंभीर समस्या आंब्याची बी आहे रामबाण उपाय.  उन्हाळा सुरु झाला की आपल्याला वेध लागतात ते आंब्याचे...कधी घरी आंब्याची पेटी येते आणि त्यावर आपण ताव मारतो असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आंब्याची कोयही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 29, 2024, 18:11 PM IST
1/7

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला वेध लागतात ते आंब्याचे...कधी घरी आंब्याची पेटी येते आणि त्यावर आपण ताव मारतो असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आंब्याची कोयही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. 

2/7

आंब्याची कोय इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. शिवाय कोलेस्ट्रॉलही कंट्रोलसोबत अनेक गंभीर आजारावर तिचा फायदा आहे. 

3/7

कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस गंभीर चालली आहे. अशात आंब्याचा आनंद लुटताना त्याचा बियांचाही वापर करुन तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता.   

4/7

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आंब्याच्या बियांचा अर्क तुम्हाला फायदेशीर आहे. या बियांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन रक्त परिसंचरण सुधारणा मदत मिळते.   

5/7

आंब्याच कोय तुमच्या दात निरोगी ठरण्यास मदत करतात. बियांची पावडर घ्या त्याने दात साफ करा. यामुळे दात मजबूत होतात आणि तोंडाच्या समस्या दूर होतात.   

6/7

आंब्याचा कोयचा पावडर हे अनेक सौंदर्य प्रसाधनमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. या पावडरमुळे त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास आंब्याची कोय फायदेशीर आहे.   

7/7

चार पाच आंब्याच्या कोय घ्या आणि त्या उन्हात वाळवा. आता कोयच्या वरचा भाग काढून त्यातील पांढरी बी मिक्सरमधून बारीक करुन घ्या. आता हे पावडर एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोर करा. जेव्हा कधी तुम्हाला या पावडरचं सेवन करायचं असेल तर एक ग्लास पाण्यात एक चम्मचा पावडर आणि एक चम्मचा मध मिक्स करुन घ्या. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)