मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 7 वा दिवस, आठवडाभर फक्त पाणी प्यायल्यास शरीरावर कसा परिणाम होतो?

Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस. गेले सहा दिवस जरांगे पाटील फक्त पाण्यावर आहेत. अशावेळी शरीरावर काय परिणाम होईल? 

| Feb 16, 2024, 12:52 PM IST

Manoj Jarange Patil Health Issue : मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. एवढंच नव्हे तर सरकारने विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.  मात्र तसे न झाल्यामुळे 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे फक्त पाण्यावर असून त्यांची प्रकृती खालावली आहे. नाकातून रक्त देखील येत आहे. असं असताना मनोज जरांगेंनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. 

1/7

Manoj Jarange Patil Health

गेल्या सहा दिवसांपासून फक्त पाण्यावर असलेल्या मनोज जरांगेंच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतील ते जाणून घेऊया. क्लिनिकल डायटिशियन लक्षिता जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे. आठवडाभर फक्त पाण्यावर राहिल्यास शरीरात काय बदल होतात ते जाणून घ्या. 

2/7

केटोसिस

Manoj Jarange Patil Health

उपवासाच्या काळात शरीर केटोसिसच्या अवस्थेत जाऊ शकते. ज्या दरम्यान ते कर्बोदकांऐवजी ऊर्जेसाठी चरबी वापरण्यास सुरवात करते. ही एक सामान्य चयापचय प्रक्रिया आहे जी तुम्ही उपवास करत असताना घडते. सात दिवस पोटात अन्न न गेल्यामुळे कॅलरीचे प्रमाण कमी होते आणि वजन अचानकपणे कमी होण्यास मदत होते. 

3/7

असा होतो परिणाम

Manoj Jarange Patil Health

आठवडाभर केवळ पाणी पिऊन राहिल्यावर वेगवेगळे परिणाम दिसू लागतात. जसे की, पहिल्यादिवशी तुमचं शरीर क्लिंन्झरप्रमाणे काम करेल. दुसरा दिवस शरीर तुम्हाला अतिशय हलके वाटेल. मात्र तिसऱ्या दिवशी शरीरावर वेगवेगळे परिणाम व्हायला सुरुवात होते. शरीर या दिवशी हळू संथ गतीने काम करते. चौथ्या दिवशी तुम्हाला शरीरात अन्नाचा दाणा नसल्यामुळे शरीर थकू लागते. हेच जर पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी ही राहिले तर शरीर अतिशय थकू शकतं. 

4/7

ऑटोफॅजिक

Manoj Jarange Patil Health

आठवडाभर फक्त पाण्यावर राहिल्यास शरीरात एक ऑटोफॅजिक प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे खराब झालेल्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्यांच्या जागी निरोगी पेशी येतात. भविष्यात सेल्युलर आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो. 

5/7

वजन कमी होणे

Manoj Jarange Patil Health

सात दिवसांच्या उपवासामुळे वजन कमी होण्याची शक्यता असते कारण यामुळे कॅलरी कमी होते आणि शरीराला चरबी आणि ग्लायकोजेन ऊर्जासाठी जळण्यास भाग पाडते. त्यामुळे या दरम्यान वजन झपाट्याने कमी होते. 

6/7

डिटॉक्स

Manoj Jarange Patil Health

सात दिवस सतत फक्त पाण्यावर राहिल्याने शरीर डिटॉक्स होतं खरं. पण ही प्रक्रिया फक्त एक ते दोन दिवसांची असते. कारण या नंतर शरीर आतून थकायला लागतं. आणि अशक्तपणा येतो. 

7/7

सात दिवस उपवास करण्याचे नुकसान

Manoj Jarange Patil Health

7 दिवस पाणी पिऊन उपवास करण्याचे फायदे आहेत तसंच त्याचे नुकसानदेखील आहे. कारण कळत नकळत शरीरात आतून बदल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे करावे. तसेच खालील व्यक्तींनी कधीच उपवास करु नये. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती असणाऱ्या महिला अथवा कोणताही गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनी हा उपवास करू नये असा सल्ला डॉक्टर देतात.