#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

Feb 03, 2019, 15:38 PM IST
1/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

धकाधकीच्या आणि व्यग्र दैनंदिन आयुष्यात वेळ काढत निसर्गाच्या काही देणग्या जपण्यासाठी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका, वंडरिंग सोल्स आणि आणि Save Navi Mumbai Environment  group यांच्या संयुक्त विद्यमाने एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 

2/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

सीवूड्स येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. रविवारी, सुट्टीच्या दिवशी शहरालाही जाग येण्यापूर्वी एका खास कारणासाठी हे सर्व धावपटू एकत्र जमले होते. 

3/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

ज्या कारणासाठी ते एकत्र आले होते ते म्हणजे फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजातीचं संरक्षण आणि खारफुटी वनांचं संवर्धन. 

4/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

नवी मुंबईच्या खाडी परिसरात असणाऱ्या खारफुटीच्या वनांचं संरक्षण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये जवळपास एक हजारहून अधिकजणांचा सहभाग पाहायला मिळाला. 

5/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

चौदा वर्षांच्या बच्चेकंपनीपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या उत्साही स्पर्धकांपर्यंत अनेकांचाच उत्साह यावेळी सर्वांमध्ये पाहायला मिळाला. 

6/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

ज्या कारणासाठी हे पाऊल त्यांनी उचललं होतं, ही धाव घेतली होती, त्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 

7/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

तरुणाईचा उत्साह, समाज आणि पर्यावरणाप्रती असणारी जबाबदारी आणि त्यासाठी उचलण्यात आलेलं सकारात्मक पाऊल या साऱ्यामुळे ही फ्लेमिंगोंसाठीतची धाव एक नवा पायंडा पाडणारी ठरली आहे असंच म्हणावं लागेल. 

8/8

#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी

.... तर अशी होती ही फ्लेमिंगोंसाठीची धाव