नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराने जारी केल्या लग्नाच्या गाईडलाईन्स

नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराने लग्नाबाबत 3 मोठे निर्णय घेतले आहेत. 

Dec 18, 2023, 18:29 PM IST

Sachkhand Gurudwara of Nanded : नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराने  लग्नाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. शीख धर्मांच्या लग्नासाठी या गाईडलाईन्स असणार आहेत.  यात नवरा नवरीच्या पोषाखासह लग्न पत्रिकेबाबत सूचना आहेत. 

1/7

सचखंड गुरुद्वारा नांदेड येथील पंजप्यारे साहिबानने शीख धर्मातील लग्नाबाबत तीन निर्णय घेतले आहेत.

2/7

तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब नांदेडचे मुख्य गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराची निर्मिती पंजाबचे महान शासक महाराज रणजितसिंहजींनी 1830 ते 1891 दरम्यान याची निर्मीती केली. 

3/7

गुरुग्रंथ साहिब यांचा अदब, सत्कार राहत नाही त्यामूळे छत्र देखील वापरू नये असे तीन निर्णय पंचप्यारे साहीबाननी घेतले आहेत.

4/7

लग्न मंडपात नवरीला आणताना तिच्या डोक्यावर ओढणी किंवा फुलाची सजावट असलेले छत्र वापरले जात आहे. 

5/7

लग्नात फेऱ्यांच्या वेळेस नवरी महागडे कपडे परिधान करते. मात्र, तसे करता लावा फेरेच्या वेळेस नवरीमुलीने गुरु मर्यादेनुसार परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावे.   

6/7

शिख धर्मात सिंघ आणि कौर हे खिताब श्री गुरुगोबिंदसिंघजी महाराजांनी दीले आहेत. यासाठी बलिदान द्यावे लागले. त्यामूळे लग्न पत्रिकेवर सिंघ आणि कौर नावाचा उल्लेख असावा.   

7/7

शीख धर्मात पुरुषांच्या नावामागे सिंघ आणि महिलांच्या नावामागे कौर लावण्यात येते. मात्र काही लग्न पत्रिकेवर नवरदेवाच्या नावामागे सिंघ आणि नवरीच्या नावामागे कौर असा उल्लेख केला जात नसल्याचे दिसून येते.