वेळ नाही, बजेट नाही, पण कुठे तरी फिरायचयं; फक्त 2000 मध्ये मुंबई जवळ महाबळेश्वरचा फिल

मुंबईजवळ एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे फक्त दोन हजार रुपयात बजेट ट्रीप प्लान करु शकता.   

Oct 27, 2024, 23:05 PM IST

Matheran Hill Station Trip : दिवाळी सगळ्यांचाच व्हेकशनचा मूड असतो. अनेकजण  आपल्या बजेट नुसार वेकेशन प्लान करतात. वेळ आणि बजेट कमी असेल तर मुंबईजवळ एकदम मस्त ठिकाण आहे. मुंबईजवळ असलेल्या या ठिकाणी फिपताना महाबळेश्वरचा फिल येईल. येथे फक्त दोम हजारमध्ये मस्त ट्रीप प्लान करु शकता. 

1/7

मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.  

2/7

प्रवासाठी 500 रुपये तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारण दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो.  शनिवार रविवार असं विकेंडला माथेरानला जाण्याचा प्लान करु शकता. 

3/7

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरानच्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते.

4/7

 इको पॉईंट, सनसेट पाईंट, वन ट्री पॉईंट, मंकी पाईंट असे अनेक अप्रतिम व्ह्यू पॉइंट येथे आहेत. 

5/7

सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे. 

6/7

डोंगराच्या कुशीत वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन आहेत.    

7/7

माथेरान मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते.