'या' इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ, कंपनीने वाढवली किंमत

सर्वाधिक विक्री होणाऱ्या Windsor EV या इलेक्ट्रिक कारच्या कंपनीने या कारच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे

| Jan 11, 2025, 14:27 PM IST
1/7

JSW MG Motor India

JSW MG Motor India ने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार Windsor EV च्या या कारच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. 

2/7

किंमत

रिपोर्टनुसार, डीलरच्या सूत्राचा हवाला देत या कंपनीने या इलेक्ट्रिक कारची किंमत अंदाजे 50,000 रुपयांनी वाढवली आहे. 

3/7

Windsor EV

कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार MG Windsor लॉन्च केली होती. लॉन्च होताच कारने खळबळ उडवून दिली.   

4/7

15 हजार बुकिंग

देशातील ही पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे, जिला बुकिंग सुरु होताच अवघ्या 1 तासात 15 हजारांपेक्षा अधिक युनिट्सचे बुकिंग मिळाले.   

5/7

टाटा मोटर्स

प्रचंड बुकिंगनंतर MG Windsor तिच्या जवळच्या प्रतिस्पर्धी टाटा मोटर्ससाठीही आव्हान बनले आहे. या कारच्या मदतीने एमजीने EV सेगमेंटमध्ये टाटालाही पराभूत केलंय. 

6/7

तीन प्रकार

ही कार दोन प्रकारात विकते. बॅटरी आणि भाड्याने घेतलेल्या बॅटरीसह. एक्साइट, एक्सक्लूसिव आणि एसेंस या तीन व्हेरिएंट प्रकारांमध्ये येते.

7/7

50 हजारांची वाढ

Excite व्हेरिएंटची किंमत सुरुवातीला 13.50 लाख रुपये होती. जी आता 14 लाख रुपये करण्यात आली आहे. तर एक्सक्लूसिव व्हेरिएंटची किंमत 14.50 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. तर टॉप व्हेरिंटची किंमत 15.50 लाख रुपयांवरून 16 लाख रुपये केली आहे.