Sai Baba Utsav : साईबाबांच्या नावावरुन मुला-मुलींची नावे, पॉझिटिव्हीटीने भरून जाईल आयुष्य

साईबाबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. अनेक पालक आपल्या मुलांची नावे साईबाबांच्या नावावरुन ठेवू इच्छितात. अशांसाठी मुला-मुलींच्या नावांचे खूप चांगले पर्याय. 

| Apr 16, 2024, 11:24 AM IST

साईबाबा उत्सवाला शिर्डित आज प्रारंभ होत आहे. जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. जगभरात साईबाबांचे अनेक भक्त आहेत. जे आपल्या मुला-मुलींना साईंच्या नावावरुन मॉडर्न नावे ठेवू इच्छितात. अशा पालकांसाठी खालील नावांचा पर्याय अतिशय उत्तम आहे. 

1/8

साईंच्या नावावरुन मुलांची नावे

Modern Boys and Girls Names on Sai Baba

साई पहिलंच नाव 'साई' हे आहे. साईबाबांचं हे नाव अतिशय खास आहे कारण या नावातून बाबांच स्मरण होणार आहे. 'साई' या नावाचा अर्थ आहे सतत स्मित हास्य करणारे, प्रेमाचं फूल, प्रत्येकवेळी, भगवान शिव, फूल, मित्र आणि आशिर्वाद. महत्त्वाचं म्हणजे हे नाव युनिसेक्स आहे. मुलगा आणि मुलगीसाठी हे नाव निवडू शकता. साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव 'साई पल्लवी' आहे. 

2/8

सइजा

Modern Boys and Girls Names on Sai Baba

जर तुमच्या मुलीचं नाव 'स' अक्षरावरुन ठेवायचं असेल तर 'सइजा' हा उत्तम पर्याय आहे. सइजा नावाचा अर्थ आहे अतिशय स्टायलिश. तसेच सइजा हे नाव साईबाबांच्या नावावरुन ठेवले आहे. 

3/8

सइश

Modern Boys and Girls Names on Sai Baba

'सइश' हे नाव 'साईश' या नावाशी मिळते जुळते आहे. या नावाचा अर्थ आहे संत साईबाबांशी निगडीत आहे. शिव शंभूच्या नावाशी संबंधित हे नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावात कुठेही आकार, उकार नाही त्यामुळे लहान बाळादेखील सहज आपलं नाव घेता येणार आहे. 

4/8

साईली

Modern Boys and Girls Names on Sai Baba

'सायली' प्रमाणेच 'साईली' हे नाव देखील तुम्ही मुलीला ठेवू शकता. फुलं, सावली, साईबाबा हे या नावाचे अर्थ आहे. 'साईली' या नावाची सुरुवात "साई' बाबांच्या नावाने होते. त्यामुळे तुम्ही मुलीसाठी हे नाव निवडलात तर कायम बाबांच स्मरण राहिल यात शंका नाही. 

5/8

साइशा -

Modern Boys and Girls Names on Sai Baba

 'सइश' प्रमाणेच मुलीचे नाव 'साईशा' ठेवू शकता. हे नाव लहान मुलांना खूप आवडते. 'साईशा' या नावाचा अर्थ जीवन, जीवन, आत्मा आणि देव आहे. या नावाची सुरुवात देखील साई बाबांच्या नावावरुन होते. त्यामुळे साइशा हे नाव खास आहे. 

6/8

सईवी

Modern Boys and Girls Names on Sai Baba

'सईवी' हे अतिशय सुंदर आणि पवित्र नाव आहे. या नावाची सुरुवातही बाबांच्या नावावरुन होते. या नावाचा अर्थ आहे शुभ आणि मंगल. मुलीसाठी हे नाव अतिशय सुंदर वाटेल. 'सईवी' हे नाव युनिक आहे. तसेच कुणालाही उच्चारायला अतिशय सोप्प आहे. 

7/8

साईआंश

Modern Boys and Girls Names on Sai Baba

'साईआंश' हे नाव अतिशय युनिक आहे. या नावाची सुरुवात देखील 'साई बाबा' यांच्या नावावरुन होते. या नावात साई आणि अंश अशा दोन नावांचा उल्लेख होतो. त्यामुळे साईचा अंश असा या नावाचा अर्थ आहे. 

8/8

साईदीप

Modern Boys and Girls Names on Sai Baba

साईबाबांना 'साईदीप' असेही म्हणतात. तुम्ही तुमच्या बाळासाठी 'साईदीप' हे नाव देखील निवडू शकता. हे नाव तुम्हाला खूप आवडेल. या नावात साई आणि दीप अशा दोन्ही नावांचा उल्लेख आहे. साईबाबांचा आणि दिव्यांचा खूप घनिष्ट संबंध आहे. त्यामुळे हे नाव तुम्हाला सतत बाबांच स्मरण राहण्यास मदत करेल.