...म्हणूनच अंबानींसारखं कोणीच नाही! आता इंटरनेचा स्पीड चौपट वाढवणार; थेट समुद्रातून...

Mukesh Ambani Business News : मुकेश अंबानी यांनी भारतीय उद्योग जगतामध्ये आजवर अनेक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 

Aug 22, 2024, 10:47 AM IST

Mukesh Ambani Business News : विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून आधुनिकतेच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर आपल्या व्यवसाय कौशल्याची छाप सोडणाऱ्या याच मुकेश अंबानी यांनी आता एक कमाल बेत आखला आहे. 

1/7

रिलायन्स

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

Mukesh Ambani Business News : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कामाची सर्व जबाबदारी आता पुढच्या पिढीकडे सोपवली असली तरीही या पिढीला ते त्यांच्या परिनं मार्गदर्शन करताना आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

2/7

स्पर्धकांवर सहजपणे मात

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

व्यवसाय क्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात करणाऱ्या याच मुकेश अंबानी यांनी आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं असून, त्यामुळं इंटरनेटचा वेग तब्बल चार पटींनी वाढणार आहे. यासाठी अंबानींच्या रिलायन्स जिओ कंपनीनं सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलशी हातमिळवणी करत मोठा प्रकल्प हाती घेतला आहे.   

3/7

रिलायन्स आणि एअरटेल

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

रिलायन्स आणि एअरटेल एकत्र आल्यामुळं येत्या काळात इंटरनेटचा वेग अधिक प्रमाणात वाढणार असून, त्यामुळं कनेक्टीव्हिटीचे नवे विक्रम प्रस्थापित होणार आहेत. भारतामध्ये दीर्घ काळापासून प्रलंबित असणारा इंटरनेटच्या वेगाचा मुद्दा यामुळं निकाली निघणार आहे.   

4/7

सूत्रांच्या माहितीनुसार...

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

सूत्रांच्या माहितीनुसार समुद्रातून जाणाऱ्या मोठाल्या केबलच्या माध्यमातून ही इंटरनेट सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवली जाणार असून, या बदलामध्ये तीम कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे. या कंपन्या म्हणजे अफ्रीका पर्ल्स, इंडिया-एशिया-एक्सप्रेस (IAX) और इंडिया-यूरोप-एक्सप्रेस (IEX).   

5/7

नवी क्रांती

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

ऑक्टोबर महिन्यापासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत हे नेटवर्क सुरू होणार असून याच्याच परिणामस्वरुप इंटरनेटचा वेग चार पटींनी वाढणार आहे. ज्यामुळं भारतातील डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये नवी क्रांती येणार आहे.   

6/7

इंटरनेट

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

2Africa ही जगातील सर्वात मोठी आणि लांब केबल यंत्रणा असून, ती साधारण 45000 किमी पर्यंत पसरली आहे. या केबलमुळं प्रति सेकंद 180 टेराबिट्सपर्यंतच्या वेगाला सपोर्ट मिळतो.   

7/7

लँडिंग स्टेशन

Mukesh Ambani reliance jio to make Undersea cable for superfast internet business news

भारती एअरटेल आणि मेटानं या प्रणालीमध्ये गुंतवणूक केली असून, यामुळं येत्या काळात तब्बल 33 देश जोडले जाणार आहेत. एअरटेलचं मुंबई लँडिंग स्टेशन या ग्लोबल नेटवर्कचं मुख्य केंद्र ठरणार आहे.