ठाकरे, शिंदेंच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो वाहने मुंबईत; कशी असेल वाहतूक व्यवस्था? कुठेय पार्किंग? जाणून घ्या
Mumbai Dasara Shiv sena Melava:
Mumbai Dasara Shiv sena Melava: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्याच आझाद मैदानावर होणार आहे.
1/10
ठाकरे, शिंदेंच्या मेळाव्यासाठी हजारो वाहने मुंबईत; कशी असेल वाहतूक व्यवस्था? जाणून घ्या
![ठाकरे, शिंदेंच्या मेळाव्यासाठी हजारो वाहने मुंबईत; कशी असेल वाहतूक व्यवस्था? जाणून घ्या Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658414-shivsena-melava-traffic1.jpeg)
Mumbai Dasara Shiv sena Melava: दसऱ्याच्या दिवशी आज राजकीय आखाडा पाहायला मिळणार आहे.. कारण दस-यानिमित्त मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय मेळाव्यांचा झंझावात पाहायला मिळेल.. मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडेल.. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी शिवाजी पार्कवरचे दसरा मेळावा गाजले.. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्याच आझाद मैदानावर होणार आहे.
2/10
हजारो वाहने मुंबईत दाखल
![हजारो वाहने मुंबईत दाखल Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658413-shivsena-melava-traffic2.jpeg)
दोन्ही मेळाव्यासाठी हजारो वाहने मुंबईत दाखल होत आहेत. या दसरा मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून 5200 हून अधिक बसेसमधून शिवसैनिक येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आली. सुमारे 8-10 हजार शिवसैनिक छोट्या चारचाकी वाहनातून रॅलीला येणार आहेत. हा आकडा जास्तही असू शकतो. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी वाशी, मुलुंड, पडघा, दहिसर चेक पॉइंटवर चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
3/10
कॉटन ग्रीन ते विधानभवनापर्यंत पार्किंग
![कॉटन ग्रीन ते विधानभवनापर्यंत पार्किंग Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658410-shivsena-melava-traffic3.jpeg)
आझाद मैदानाच्या काठावरील मैदानातही व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणातून बसने येणारे शिवसैनिक बॅलार्ड इस्टेट येथे उतरणार असून त्यांच्या बसेस जीआरपी आयुक्त कार्यालय रोड, कर्णक बंदर येथे पार्किंग देण्यात आल्या आहेत.. मुंबई-ठाण्याहून येणाऱ्या बसेस बॅलार्ड इस्टेटमध्ये येणार असून या बसेसना कॉटन ग्रीनमध्ये पार्किंग देण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बस हरनिमान सर्कलवर उतरतील, भाऊचा धक्का येथे या बसेससाठी पार्किंग व्यवस्था आहे.
4/10
मराठवाडा, विदर्भातून येणारी वाहने
![मराठवाडा, विदर्भातून येणारी वाहने Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658409-shivsena-melava-traffic4.jpeg)
मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या बसेस शिवसैनिकांना गेट क्रमांक 11 येथे सोडतील, त्या बसेससाठी शिवडी बीपीटी पार्किंगमध्ये पार्किंग व्यवस्था आहे. मुंबई-ठाणे आणि कोकणातून येणाऱ्या छोट्या चारचाकी वाहनांसाठी विधानभवन, एनसीपीए आणि मनोरा आमदार निवास येथे पार्किंग असेल आणि कुलाबा येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिकअप आणि ड्रॉप उपलब्ध असेल.मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या छोट्या वाहनांसाठी दाणाबंदर, भाऊचा धक्का, शिवडी ए ब्लॉक बीपीटी रोड येथे पार्किंग आणि गेट क्रमांक 18 येथून पिकअप-ड्रॉप असेल.
5/10
रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल
![रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658408-shivsena-melava-traffic5.jpeg)
6/10
सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रवेश
![सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रवेश Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658407-shivsena-melava-traffic6.jpeg)
7/10
ठाकरे गटाकडूनही चोख बंदोबस्त
![ठाकरे गटाकडूनही चोख बंदोबस्त Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658406-shivsena-melava-traffic7.jpeg)
8/10
पिक-अप-ड्रॉपचीही सोय
![पिक-अप-ड्रॉपचीही सोय Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658405-shivsena-melava-traffic8.jpeg)
9/10
मोठ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
![मोठ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था Mumbai Dasara Shiv sena Thackeray shinde Group Melava traffic Parking details](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/24/658404-shivsena-melava-traffic9.jpeg)