नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा

Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या. 

Dec 27, 2023, 16:57 PM IST
1/7

प्रवाशांची गर्दी

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

शहरात येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय आणि रेल्वे सेवांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

2/7

विशेष उपनगरीय सेवा

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

उपलब्ध माहितीनुसार मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 4 विशेष उपनगरीय सेवा चालवणार आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री या उपनगरिय रेल्वे सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.   

3/7

मध्य रेल्वे

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

रेल्वेकडून मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)वरून विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुटून ती कल्याण येथे  03.00 वाजता पोहोचेल.

4/7

कल्याणहून विशेष ट्रेन

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

कल्याणहून विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री  01.30 वाजता निघून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 03.00 वाजता पोहोचेल.  

5/7

हार्बर लाइनवरील विशेष ट्रेन

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

हार्बर लाइनवरील विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री CSMT हून 01.30 वाजता सुटून 02.50 वाजता पनवेलला पोहोचेल.

6/7

पनवेलहून एक विशेष ट्रेन

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

पनवेलहून एक विशेष ट्रेन  31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री 01.30 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटीला 02.50 वाजता येईल.

7/7

प्रवासाची आखणी करा

Mumbai local Central railway special trains time table on year end new year eve

रेल्वेच्या वतीनं सोडण्यात येणाऱ्या या विशेष उपनगरीय ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळांनुसार तुमच्या प्रवासाची आखणी करा.