एक ओंकार सतनाम...; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नी प्रार्थनेत रमल्या, ओळखणंही कठीण

Navjot Kaur News: आजारपणानं शरीर खंगतंय पण, जगण्याचा निर्धार नाही... पाहा वाहेगुरुंच्या भक्तीत तल्लिन झालेल्या नवज्योत कौर...   

Aug 31, 2023, 17:01 PM IST

Navjot Kaur News: जीवनात अनेकदा आव्हानं पूर्वसुचना देऊन येत नाहीत. बऱ्याचदा ही आव्हानं इतकी मोठी असतात की त्यांच्याशी दोन हात करताना माणसं अशी काही खचतात की, त्यातून पुन्हा सावरणंही कठीण होऊन जातं. 

 

1/7

सकारात्मक दृष्टीकोन

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोनंच तुम्हाला यातून बाहेर काढू शकतो. सध्या य़ाचीच प्रचिती येत आहे पंजाबमधील काँग्रेस नेता आणि माती क्रिकेटपटू नवज्योत सिंह यांच्या पत्नीला.   

2/7

देवापुढं नतमस्तक

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

कॅन्सरसारख्या (Cancer) आजाराशी दोन हात करताना एकिकडे ही झंज सुरु असतानाच दुसरीकडे सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर देवापुढं नतमस्तक होताना दिसत आहेत. सिद्धू यांनीच सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीचे काही फोटो शेअर केले आहेत.   

3/7

कमालीची सकारात्मकता

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

नुकतंच सिद्धू यांच्या पत्नीनं अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देत तिथं गुरुग्रंथसाहेबपुढे प्रार्थना केली. इथं येताना नवज्योत कौर यांच्या चेहऱ्यावर कमालीची सकारात्मकता पाहायला मिळाली.   

4/7

दुखभंजनी बेरी

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

सूत्रांच्या माहितीनुसार अखेरच्या केमोथेरेपीनंतर नवज्योत कौर तिथं पोहोचल्या. इथं त्यांनी दुखभंजनी बेरीमध्ये स्थानही केलं. आजारपणाच्या या काळात त्यांना हे क्षण सुखावून गेले.   

5/7

प्रकृतीत सुधार

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या कौर यांची प्रकृती बऱ्याच अंशी सुधारत असून, त्या आजारपणातून सावरत आहेत. पण, त्यासाठीही काही काळ जाणार आहे.   

6/7

मोठी शस्त्रक्रिया

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

काही महिन्यांपूर्वीच नवज्योत कौर यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यानंतर त्यांची केमोथेरेपी सुरु झाली. सध्या त्यांना ब्रेस्ट ट्रीटमेंट दिली जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.   

7/7

खास पोस्ट

Navjot Singh Sidhu wife Navjot Kaur visits Golden Temple while batteling with cancer

सिद्धी यांच्या पत्नी आताच्या क्षणी शस्त्रक्रियेच्या व्रणांतून सावरल्या असल्या तरीही त्यांच्या मानसिकतेवर झालेले आघात मात्र त्यांचा पाठलाग सोडण्यास आणखी काही वेळ घेतील असंच काँग्रेस नेत्यानं काही दिवसांपूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.