Neil Wagner: क्रिकेटला अलविदा म्हणताना न्यूझीलंडच्या गोलंदाजाला अश्रू अनावर, सामन्याच्या 48 तासांपूर्वी घेतली निवृत्ती

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

| Feb 27, 2024, 11:22 AM IST
1/7

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

2/7

प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्याशी चर्चा केल्यानंतर 37 वर्षीय खेळाडू नीलने हा भावनिक निर्णय घेतला. 

3/7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दोन टेस्ट सामन्यांच्या सिरीजच्या 48 तास आधी वॅगनरने निवृत्ती जाहीर केली. 

4/7

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये वॅगनरला स्थान मिळालेले नाही. यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली.

5/7

निवृत्ती जाहीर करताना नील वॅगनरला अश्रू अनावर झाले होते. त्याने 2012 मध्ये न्यूझीलंडसाठी पहिला सामना खेळला होता.

6/7

ICC टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी आणि 2021 मध्ये होणाऱ्या पहिल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या संघाच्या प्रवासात वॅग्नरने महत्त्वाची भूमिका बजावली. 

7/7

नीलने एकूण 64 कसोटी खेळल्या आणि त्यापैकी 32 जिंकल्या आहे. त्या विजयांमध्ये त्याने 143 विकेट घेतल्याची नोंद आहे.