निळ्या नाही भगव्या रंगात दिसणार 'वंदे भारत'! रंग बदलाचं कारण सांगतानाच रेल्वे मंत्र्यांनी दिली 25 Changes ची माहिती

Saffron Colour Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये आता 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन नव्या लूकमध्ये दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र ट्रेनचा रंग का बदलण्यात आला आहे यासंदर्भातील माहिती रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे मंत्र्यांनीही दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या बदलासंदर्भात...

| Jul 09, 2023, 09:41 AM IST
1/10

Saffron Colour Vande Bharat Express

पूर्णपणे भारतीय बनावटीच्या 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे आता निळ्या आणि पांढऱ्या कॉम्बीनेशनबरोबरच भगव्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्येही दिसणार आहेत. यासंदर्भातील माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या गाडीचे पहिले फोटोही समोर आले आहेत.

2/10

Saffron Colour Vande Bharat Express

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय बनावटीच्या या सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या 28 व्या ट्रेनचा रंग भगवा असणार आहे. मात्र अद्याप ही ट्रेन निर्माणाधीन असून तिला फिनिशिंग देण्याचं काम सुरु आहे. सध्या ही ट्रेन चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये आहे. याच रेल्वे कारखान्यात सर्व 'वंदे भारत' एक्सप्रेस तयार केल्या जातात.

3/10

Saffron Colour Vande Bharat Express

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या 25 गाड्या देशभरातील वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. इतर 2 ट्रेन बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, "28 व्या ट्रेनचा रंग प्रयोग म्हणून बदलण्यात येत आहे. या ट्रेनला भगवा रंग देण्यात आला आहे," असं सांगितलं.

4/10

Saffron Colour Vande Bharat Express

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये जाऊन या ट्रेनच्या कामाची पहाणी केली. 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या बांधणीबरोबरच दक्षिण रेल्वेमधील सुरक्षा उपाय योजनांची माहिती अश्विनी वैष्णव यांनी घेतली. येथील कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांच्याबरोबरचा एक फोटोही अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे.

5/10

Saffron Colour Vande Bharat Express

या पहाणीनंतर अश्विनी वैष्णव यांनी या कारखान्यातील भगव्या रंगाच्या ट्रेनचा फोटो ट्वीट केला. त्यांनी ही 28 वी 'वंदे भारत' एक्सप्रेसचा रंग भगवा का आहे याबद्दल माहिती देताना, 'भारतीय तिंरग्याने प्रेरित' असं म्हटलं आहे. 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये एकूण 25 बदल करण्यात आल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.

6/10

Saffron Colour Vande Bharat Express

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, "ही मेक इन इंडिया ट्रेन आहे. म्हणजेच भारतामध्ये आपल्याच इंजिनिअर्सने आणि तंत्रज्ञांनी ही ट्रेन डिझाइन केली आहे. त्यामुळे 'वंदे भारत' एक्सप्रेसमधील एसी, शौचालय आणि इतर सुविधांसंदर्भात आम्हाला जे काही सल्ले आणि फिडबॅक मिळाला त्यानुसार डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे," अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

7/10

Saffron Colour Vande Bharat Express

शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधील गोरखपुर रेल्वे स्थानकावर 2 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेन गोरखपूर-लखनऊ आणि जोधपूर-साबरमतीदरम्यान धावतील.

8/10

Saffron Colour Vande Bharat Express

पंतप्रधान मोदींनीच 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली आणि वाराणसीदरम्यान धावलेल्या पहिल्या 'वंदे भारत' एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये (आयसीएफमध्ये) सर्व 'वंदे भारत' एक्सप्रेस तयार केल्या जातात. यापूर्णपणे भारतीय बनवाटीच्या ट्रेन आहेत.

9/10

Saffron Colour Vande Bharat Express

'वंदे भारत' एक्सप्रेस या सेमी-हाय-स्पीड ट्रेन बनवण्याची योजना 2017 च्या मध्यापासून सुरु झाली. त्यानंतर 18 महिन्यांमध्येचे आयसीएफ चेन्नईने अशा 18 ट्रेन तायर केला. 2019 मध्ये या ट्रेन्सला 'वंदे भारत' एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं.

10/10

Saffron Colour Vande Bharat Express

'वंदे भारत' एक्सप्रेसने चाचणीदरम्यान कोटा तेस सवाई माधोपूर जंक्शनदरम्यान सर्वोच्च म्हणजेच 180 किमी प्रती तास हा वेग गाठला होता. महाराष्ट्रातून 4 मार्गांवर 'वंदे भारत' एक्सप्रेस धावते. मुंबई-शिर्डी, मुंबई-सातारा, मुंबई-गोवा आणि नागपूर-बिलासपूर मार्गावर या ट्रेन धावतात.