नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना लक्षात ठेवा वास्तुशास्त्राचे 'हे' नियम; अन्यथा...

नवीन वर्षाचे स्वागत करताना त्या वर्षांचे कॅलेंडर आधीच घरात आणले जाते. पण कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 

| Jan 01, 2024, 17:49 PM IST

New Year 2024 Vastu Tips For Calendar: नवीन वर्षाचे स्वागत करताना त्या वर्षांचे कॅलेंडर आधीच घरात आणले जाते. पण कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 

1/7

नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना लक्षात ठेवा वास्तुशास्त्राचे 'हे' नियम; अन्यथा...

new year calendar 2024 keep at these places of home

 नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षांच्या आधीच काही घरात दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आणले जाते. तसंच, नवीन वर्ष चांगले जावे यासाठी घरात काही जण पूजा-पाठ करतात किंवा शुभ कार्य केले जाते जेणेकरुन त्यांचे नवीन वर्ष सुखाचे जाईल. पण घरात तुम्ही कॅलेंडर कोणत्या दिशेला लावतो हे देखील महत्त्वाचे ठरते. घरात कॅलेंडर लावण्याबाबत वास्तु नियमांचे पालन केले जाते. 

2/7

वास्तुशास्त्राचे नियम

 new year calendar 2024 keep at these places of home

चुकीच्या ठिकाणी कॅलेंडर लावल्यामुळं घरात नकारात्मकता पसरते आणि यशात अडथळे येतात. चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळं आयुष्यात वाईट वेळ सुरू होते, असं वास्तुनियम सांगतात. त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे हे जाणून घ्या.

3/7

वास्तुशास्त्राचे नियम

 new year calendar 2024 keep at these places of home

 वास्तुनुसार, कधीच घराच्या मुख्य दरवाजावर कॅलेंडर लावू नये. यामुळं तुमच्या यशात अडथळे निर्माण होतात. काम पूर्ण होत नाहीत. 

4/7

वास्तुशास्त्राचे नियम

 new year calendar 2024 keep at these places of home

नवीन वर्षांचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे लावणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ ठरेल. नेहमी कॅलेंडर समोरच लावा आणि ती जागा स्वच्छ ठेवा. 

5/7

वास्तुशास्त्राचे नियम

 new year calendar 2024 keep at these places of home

अनेक जण नवीन वर्षांचे कॅलेंडर तर लावतात पण जुन्या वर्षाचे कॅलेंडर काढण्यास विसरतात. ही चुक तुम्ही करु नका. जुनं कॅलेंडर घरात ठेवू नका. यामुळं तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रगती होत नाही. 

6/7

वास्तुशास्त्राचे नियम

 new year calendar 2024 keep at these places of home

वास्तुशास्त्रानुसार, कॅलेंडर लावण्याची योग दिशा उत्तर पश्चिम किंवा पूर्वेकडील भिंत आहे. कॅलेंडर कधीच दक्षिण दिशेला लावू नये असं केल्याने आरोग्य आणि आर्थिक स्थीती बिघडेल. 

7/7

Disclaimer

 new year calendar 2024 keep at these places of home

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)