Bank Jobs 2023: 'या' बँकेत मिळवा घसघशीत पगाराची नोकरी; 6 फेब्रुवारी शेवटची तारीख

Bank Jobs 2023: एखाद्या खासगी क्षेत्रात नोकरी करून सुट्ट्याही नाही आणि पगारही नाही, असं रडगाणं तुम्हीही लावताय का? पाहा ही बातमी 

Jan 24, 2023, 11:04 AM IST

Bank Jobs 2023: चांगल्या पगाराची, आठवड्याच्या शेवटी सुट्ट्या असणारी, सणावारांना सुट्टी देणारी एखादी नोकरी तुम्हीही शोधताय? आम्ही कामात मागे नाही पडणार, पण नोकरीच्या ठिकाणचा मनस्तापही नको असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्हीही आहात? मग ही माहिती तुमच्यासाठीच. 

1/5

National Housing Bank jobs

​​NHB Vacancy bank jobs 2023 latest news salary and other details

नॅशनल हाऊसिंग बँक (National Housing Bank) यांच्या वतीनं नोकरभरतीसाठीची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठीची प्रक्रिया सुरु झाली असून, तुम्ही  www.nhb.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्यासाठी अर्ज करु शकता. 6 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं हा दिवस विसरू नका.   

2/5

bank jobs advertisment

​​NHB Vacancy bank jobs 2023 latest news salary and other details

तुम्ही या नोकरीसाठी डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, रिजनल मॅनेजर, अससिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर या पदांसाठी अर्ज करू शकता. 35 जागांवर ही नोकरभरती होणार आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक मर्यादा निर्धारित केली असून, संकेतस्थळावर त्यासंबंधिची माहिती देण्यात आली आहे. 

3/5

bank jobs age limit

​​NHB Vacancy bank jobs 2023 latest news salary and other details

विविध पदांसाठी असणाऱ्या या नोकरभरतीमध्ये 23 वर्षांपासून अगदी 64 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा आखण्यात आली आहे. ज्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

4/5

bank job application fees

​​NHB Vacancy bank jobs 2023 latest news salary and other details

नोकरभरतीच्या या प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना अर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. 

5/5

Bank jobs and salary

​​NHB Vacancy bank jobs 2023 latest news salary and other details

सदर भरती ज्या पदांवर होत आहे त्या पदांचं महत्त्वं पाहता उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना त्याच तोडीचा पगारही (salary) लागू होणार आहे.