महाराष्ट्रात थायलंडचा फिल! कोकणातील या पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यावर एकदा येऊन तर बघा

सिंधुदुर्गमधील  सुंदर समुद्र किनारा थायलंडला टक्कर देतो.  

Apr 07, 2024, 22:57 PM IST

Nivati Beach, Vengurla, Maharashtra Konkan Tour : कोकण म्हणजे स्वर्गसुख... कोकणातील समुद्र किनारे परदेशातील समुद्र किनाऱ्यांना टक्कर देतात. असाच एक एक समुद्र किनारा सिंधुदुर्गमध्ये आहे. या समुद्र किनाऱ्याला एकदा आवर्जून भेट द्या. 

1/7

थायलंड हे अनेकांच्या बकेट लिस्टमधील डेस्टिनेशन आहे. महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे गेल्यावर थायलंडचा फिल येईल. 

2/7

 कुडाळपासून साधारण 25 किमी वर निवतीचा समुद्र किनारा आहे.  

3/7

या समुद्रकिनाऱ्यावर बसून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभताना रोजचे ताण तणाव कुठल्याकुठे विरघळून जातात.

4/7

 किनाऱ्यावरची नारळी-पोफळी आणि सुपारीची झाडं दौलत मिरवत उभी आहेत.....  सूर्योदय आणि सूर्यास्त असे सृष्टीतले दोन्ही उत्कट सोहळे अनुभवण्याची उत्तम ठिकाणं म्हणजे निवची समुद्र किनारा.   

5/7

थायलंडप्रमाणे येथे पांढरी रेती आहे. सुमद्राचा तळही दिसेल, इतकं स्वच्छ आणि निळंशार पाणी असा हा समुद्र किनारा आहे. 

6/7

स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भूत सौंदर्य म्हणजे निवती समुद्र किनारा.   

7/7

कोकणातील सिंधुदुर्ग एक असा अनोखा समुद्र किनारा आहे जो सौंदर्याच्या बाबतीत थायलंडला टक्कर देतो.