चोरी झालेले मोबाईल शोधणार CEIR... सरकारने आणली खास ट्रॅकिंग सिस्टम

Mobile Tracking System : मोबाईल फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यावर आपल्याला काय करावं हे सुचत नाही. एकतर मोठं नुकसान झालेलं असते. दुसरे तो पुन्हा मिळेल की नाही याची चिंता असते. अशा वेळी आपण तक्रार करायला जातो. पण मोबाईल ट्रॅक करायला आणि नंबर ब्लॉक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता सरकारच्या एका निर्णयामुळे हा त्रास कमी होणार आहे.

May 15, 2023, 19:03 PM IST
1/8

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर यासाठी केंद्र सरकार नवीन यंत्रणा सुरू करणार आहे. चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा तयार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (फोटो सौजन्य -  Pixabay)  

2/8

mobile tracking

सरकार या आठवड्यात ट्रॅकिंग सिस्टम सुरू करणार आहे. याद्वारे, देशभरातील लोक त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन 'ब्लॉक' किंवा ट्रेस करू शकतील. 

3/8

CEIR system

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) असे या यंत्रणेचे नाव आहे. ही यंत्रणा 17 मे रोजी लाँच होणार आहे. लोक याद्वारे  त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ट्रेस किंवा ब्लॉक करू शकणार आहेत.

4/8

CDOT

टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDOT) दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रासह काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) प्रणाली चालवत आहे.

5/8

Department of Telecommunications

दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आता ही यंत्रणा देशपातळीवर सुरू केली जाऊ शकते. 17 मे रोजी देश पातळीवर सीईआयआर प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

6/8

Stolen mobile phones

CEIR हे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एक पोर्टल आहे. हे पोर्टल सर्व हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करण्याची सुविधा देते. जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून.  

7/8

moblie number block

जर एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलेला मोबाईल फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर तो ट्रेस केला जाऊ शकतो. मोबाईल फोन सापडल्यानंतर तो पोर्टलवर अनब्लॉक केला जाऊ शकतो जेणेकरून त्याचा मूळ मालक त्याचा वापर करू शकेल.

8/8

IMEI Numbar

ही प्रणाली अंगभूत यंत्रणेसह सुसज्ज आहे. केंद्र सरकारने यासाठीच यापूर्वी IMEI क्रमांक जाहीर करण्यास सांगितले होते. या पोर्टमध्ये आधीपासूनच IMEI क्रमांकांची यादी असेल. जर कोणी IMEI बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती लगेचच मिळणार आहे.