आधी डोकं आपटलं मग कपाळावर कॉइन लावलं अन्...; PM मोदींची चिमुकल्यांबरोबरची 'मस्ती' चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लहान मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी सोडत नाहीत. पंतप्रधान मोदी अनेकदा विविध राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांची भेट घेत असतात. यावेळी त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत पंतप्रधान आपला वेळ घालवतात. अशाच दोन लहान मुलांसोबत पंतप्रधान मोदी मजामस्ती करताना दिसत आहेत. 

Nov 16, 2023, 11:18 AM IST
1/8

pm modi instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर लहान मुलांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची अशी स्टाईल कदाचित तुम्ही याआधी पाहिली नसेल. 

2/8

pm modi magic

व्हिडिओमध्ये पंतप्रधानांची अनोखी जादू पाहायला मिळते. आधी मुलं आपापसात भांडताना दिसतात. मग ते एक रुपयाचे नाणे कपाळावर चिकटवतात. त्या मुलांसोबतही ते असाच प्रयत्न करतात. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत मुलांसोबत घालवलेले काही संस्मरणीय क्षण, असे कॅप्शन दिले आहे.

3/8

pm meet children

पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेक प्रसंगी मुलांसोबत हसताना आणि मस्ती करताना दिसले होते. 

4/8

pm modi video

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सुरुवातीला पंतप्रधान दोघांची डोकी एकमेकांवर आदळतात.

5/8

modi with children

त्यानंतर पंतप्रधान मोदी या मुलांना एक जादू दाखवण्याचा प्रयत्न करतात. पंतप्रधान एक नाणं स्वतःच्या कपाळावर चिपकवात आणि डोक्याच्या मागे मारुन ते खाली पाडतात.

6/8

modi with friend

त्यानंतर लहान मुलीसोबतच ही जादू करतात मात्र यावेळी ते चलाखीने नाणं बाजूला काढून घेतात आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर मारतात. पण नाणे खाली पडत नाही. त्यानंतर मुलगी मोदींच्या हातात नाणं असल्याचे सांगते.  

7/8

pm narendra modi

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लहान मुलासोबतही हिच जादू केली. मात्र त्या लहानग्याला शेवटपर्यंत नाणं मिळत नाही.

8/8

pm modi with children

यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी 'ऑल इंडिया एज्युकेशन समागम'च्या उद्घाटन कार्यक्रमात मुलांची भेट घेतली होती.