आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

May 10, 2020, 12:21 PM IST
1/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

मे महिला उजाडला की प्रत्येकालाच वेध लागतात ते म्हणजे दरवर्षी हक्काने येणाऱ्या एका पाहुण्याचे. एक असा पाहुणा जो जीभेचे चोचले पुरवतो. 

2/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

हा पाहुणा म्हणजे फळांचा राजा, आंबा. कोकण भागातील मातीची चव आणि त्यात अर्थातच कोकणच्या माणसांचं प्रेम आपल्यात सामावून घेणाऱ्या याच फळांच्या राजाने आता थेच विठुरायाचा गाभारा गाठला आहे. 

3/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असताना, पंढरपूरमध्ये विठ्ठर- रुक्मिणी मंदिरात मात्र एक वेगळा साज चढवल्याचं पाहायला मिळत आहे. 

4/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोसमातील बहुप्रतिक्षित अशा हापूस आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. 

5/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

मंदिराच्या गाभाऱ्याला देण्यात आलेलं आमराईचं हे रुप विठुरायाच्या साजिऱ्या रुपास आणखी उठावदार बनवत आहे. 

6/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

तर, रुक्मिणी मातेच्या आजूबाजूलासुद्धा हा आमराईचा साज अगदी शोभून दिसत आहे. 

7/7

आमराईने सजला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा गाभारा

विठ्ठल- रुक्मिणीच्या या रुपाची झलक पाहता, खरंच निस्सिम भक्तीने मनात हे चित्र साठवण्यासाठीच अनेकांची धडपड होत असणार यात शंका नाही.