Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण येतोय, 'या' चुका करु नका!

Makar Sankranti Mistakes in Marathi: हिंदू धर्मात मकर संक्रांतीचं खूप महत्त्व असून मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो. येत्या सोमवारी 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. 

Jan 13, 2024, 21:58 PM IST
1/7

मकर संक्रांत तिथीला सुरुवात 14 जानेवारी 2024 ला रात्री 08.43 वाजेपासून होईल.  तर मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीला सकाळी 06:47 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी 05:40 वाजेपर्यंत असणार आहे. 

2/7

मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन चुकूनही करु नये. या दिवशी कांदा लसणापासून आणि मांसपासून दूर राहावे.  

3/7

मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरु नये किंवा कोणाचाही अपमान करु नयेत.  

4/7

मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानलं जातं म्हणून या दिवशी तुळस चुकूनही तोडू नये.   

5/7

या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा, दारू, सिगारेट, गुटखा इत्यादींचं सेवन करु नयेत.

6/7

या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न ग्रहण करु नयेत. या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करणे शुभ मानले जाते.

7/7

मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरीतून कोणीही उपाशी जाऊ नये. भिकारी, साधू किंवा वृद्ध लोकांना रिकाम्या हाताने पाठवू नये. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)