SBIकडून देशातील पहिला ग्रीन कार लोन; जाणून घ्या तुम्हाला कसा होईल फायदा

Sep 01, 2020, 12:41 PM IST
1/5

ग्रीन कार लोनची वैशिष्ट्ये

ग्रीन कार लोनची वैशिष्ट्ये

ग्रीन कार लोन फक्त २१ ते ६७ वयोगटातील तरूणांना मिळणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी SBIकडून ग्राहकांना तीन ते आठ वर्षांचा कालावधी मिळणार आहे.   

2/5

व्याज दर

व्याज दर

ग्रीन कार लोनद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीवर सामान्य कार कर्जापेक्षा २० पॉईंट कमी व्याज दराने कर्ज दिले जात आहे. संपूर्ण भारतात SBI आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे.  

3/5

केंद्रीय कर्मचार्‍यांना कार खरेदीसाठी इतके कर्ज मिळेल

केंद्रीय कर्मचार्‍यांना कार खरेदीसाठी इतके कर्ज मिळेल

केंद्र सरकारचे कर्मचारी, सैन्य आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे कर्मचारी आणि संरक्षण उपक्रम करणार्‍या कर्मचार्‍यांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे वर्षाचे उत्पन्न किमान ३ लाख असायला हवे.   

4/5

प्रोफेशनल व्यक्तींना देखील मिळेल कर्ज

प्रोफेशनल व्यक्तींना देखील मिळेल कर्ज

Professionals, self-employed, businessmen व्यक्तींना देखील ग्रीन कार लोन मिळेल. मात्र त्यासाठी त्यांचे वर्षाचे उत्पन्न किमान ३ लाख असायला हवे. 

5/5

शेती व्यवसायाशी निगडीत लोकांना देखील मिळेल कर्ज

शेती व्यवसायाशी निगडीत लोकांना देखील मिळेल कर्ज

शेती व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांना देखील कर्ज मिळणार आहे. त्यासाठी त्यांचे वर्षाचे उत्पन्न किमान ४ लाख असायला हवे.