टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा किती शिकलाय माहित आहे? जाणून घ्या त्याच्या कुटुंबाबद्दल, पाहा Photo

Rohit Sharma Family : श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका (India vs Sri Lanka T20 Series) जिंकल्यानंतर भारतीय टीम (Team India) आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत (India vs Sri Lanka ODI Series) दोन हात करणार आहे. वयाच्या अवघ्या 20 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित आज टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. आयपीएलमध्ये (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितने तब्बल तीन वेळा मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) जेतेपद मिळवून दिलंय.

Jan 21, 2023, 14:17 PM IST
1/7

रोहित शर्माच्या पत्नीचं नाव रितीका सजदेह (Ritika Sajdeh) आहे. रितिका स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर असून 2008 मध्ये रोहित आणि रितिकाची ओळख झाली. आपल्या लकी बोरीवली स्पोर्ट्स मैदानावर रोहितने रितिकासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर एप्रिल 2015मध्ये रोहितने रितिका सचदेवसह साखरपुडा केला आणि 13 डिसेंबर 2015 रोजी त्यांचं लग्न झालं.

2/7

लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजे 30 डिसेंबर 2018 रोजी रोहित आणि रितिका पालक बनले. त्यांना कन्यारत्न झालं तिचं नाव त्यांनी समायरा (Samaira Sharma) ठेवलं आहे. स्पर्धा नसतात तेव्हा रोहित आपला संपूर्ण वेळ मुलगी समायराबरोबर घालवतो. 

3/7

30 एप्रिल 1987 मध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर इथं रोहितचा जन्म झाला. रोहितच्या वडिलांचं नवा गुरुनाथ तर आईचं नाव पोर्णिमा आहे. वडिल गुरुनाथ एका परिवहन कंपनीत कामाला होते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोहित संगोपन त्याच्या काकांकडे म्हणजे मुंबईतल्या बोरीवली इथं झालं

4/7

1999 मध्ये रोहितने क्रिकेट शिबिरात भाग घेतला होता, इथेच त्याला त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dines Lad) भेटले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित शर्माने क्रिकेटचे धडे गिरवले. 

5/7

रोहितच्या कुटुंबात आई-बाबांव्यतिरिक्त त्याचा मोठा भाऊ आहे. रोहितच्या लहान भावाचं नावं विशाल शर्मा आहे. त्याचं लग्न झालं असून तिचं नाव दीपाली आहे. 

6/7

रोहित शर्मा क्रिकेटव्यतिरिक्त रोहित आपला बराचसा वेळ कुटुंबाला देतो. क्रिकेटमध्ये हिटमॅन हे रोहितचं टोपणनाव आहे. रोहितचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे.

7/7

रोहित शर्मा आयपीएलमध्ये सध्याचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. एका आयपीएल स्पर्धेत त्याने आपल्या आईला म्हणजे पोर्णिमा शर्मा यांना सामने पाहण्यासाठीदेखील आणलं होतं.