बर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?

NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत. 

Mar 01, 2024, 10:17 AM IST

NASA Shares Earths New Photos : ‘नासा’नं आतापर्यंत कायमच अंतराळाविषयीच्या काही गोष्टी जगापुढं आणत सर्वांनाच हैराण केलं आहे. अशा या नासाकडून आता पुन्हा एकदा पृथ्वीचे काही नवे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

1/7

स्पेस स्टेशन

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

नासानं आयएसएसच्या कक्षेतून टीपलेले काही अद्भूत फोटो शेअर केले. जिथं स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती 17500 मैल अर्थात ताशी 36000 किमी वेगानं फिरत असल्याची माहिती दिली.   

2/7

अद्भूत दृश्य

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

नासानं शेअर केलेल्या फोटोंनुसार सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये बर्फानं अच्छादलेल्या हिमलायच्या पर्वतरांगा अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. तर, काही फोटोंमध्ये अमेरिकेच्या बहामासचं सौंदर्य पाहता येत आहे. पुढच्या काही फोटोंमध्ये सौदी अरब येथील वाळवंटाची दृश्य जगापुढं येत आहेत. 

3/7

अशी दिसते पृथ्वी

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

नासानं शेअर केलेले हे फोटो पाहताना आपण नेमके ज्या पृथ्वीवर राहतो ती अवकाशातून कशी दिसते याची कमाल झलक अगदी सहजपणे पाहता येत आहे.   

4/7

निळाशार समुद्र

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

निळाशार समुद्र, ढगांची दाटी, रात्रीच्या अंधारात लुकलुकणारी आणि अवकाशातून इवलिशी दिसणारी शहरं पृथ्वीचा पृष्ठ असे सुरेख नजारे इथं पाहायला मिळत आहेत. 

5/7

पृथ्वीचा आकार...

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

पृथ्वीचा आकार आणि इथं होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रानुसार नासानं हे टीपलेले फोटो पाहताना अनेकजण भारावून जात आहेत. कैक मैल दूर असणाऱ्या अवकाशातून दिसणारं हे सृष्टीसौंदर्य डोळ्यांमध्ये साठवावं इतकं कमाल आहे. 

6/7

नासानं शेअर केले फोटो

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

अंतराळ आणि तिथं असणाऱ्या अनेक गोष्टींविषयी सर्वांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळालं आहे. अशा या कुतूहलामध्ये नासाच्या या फोटोंनी भर टाकली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.   

7/7

नासा

photos Nasa shares images of Himalayas To The Bahamas Shows Various Parts Of Earth

नासानं फोटो शेअर करत दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दर 90 मिनिटांमध्ये पृथ्वीला एक फेरी मारतं, त्याच क्षणाचे हे फोटो टीपण्यात आले आहेत. (सर्व छायाचित्र- नासा/NASA)