PM Modi Mother Heeraben Modi Death : पाहा मोदी आणि त्यांच्या आईचे न पाहिलेले फोटो

 लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.

Dec 30, 2022, 09:07 AM IST

PM Modi Mother Demise: आईच्या निधनाचं वृत्त कळताच पंचप्रधान (PM Modi) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हिराबा (Heeraben Modi) यांच्या आठवणींमध्ये ते रमले आणि भावनांच्या भरात एक आठवण देशवासियांपुढेही आणली. पंतप्रधान म्हणाले, 'आईच्या 100 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा मि त्यांना भेटलो तेव्हा त्या एकच गोष्ट म्हणाल्या होत्या, जी माझ्या कायम लक्षात राहील. ती गोष्ट म्हणजे बुद्धीनं काम करा आणि शुद्धीनं आयुष्य जगा'. 

1/5

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आई हिराबेन (Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे, शुक्रवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अचानक तब्येत बिघडल्याने शुक्रवारी त्यांना  ‘यू एन मेहता इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर’ मध्ये भरती करण्यात आलं होतं. 100 व्या वर्षी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला आहे (pm modi mother heeraben modi passed away)

2/5

मोदी यांच्या जीवनात आईचे स्थान अतिशय महत्वाचं होतं.  हीराबेन आता या जगात नाहीयेत मात्र त्या कोणीही असाधारण व्यक्ती नव्हत्या संघर्ष आणि मेहनतीची जिवंत मूर्ती होत्या. स्वतःच्या आदर्श आणि तत्वांवर कायम राहून त्या संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी राहिल्या.  . 

3/5

हिराबेन यांच्या आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष पाहिला आहे, मात्र सर्व समस्यांवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं लहानच मोठं केलं. त्या सर्वांचा विचार करणाऱ्या होत्या , स्वतःचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाल्यावरही त्यांना कुठलाच गर्व नव्हता त्या अतिशय शांत आणि समजूतदार होत्या.   

4/5

हीराबेन यांचा जन्म मेहसाणा जिल्ह्यात विसनगर गावी झाला होता लहानपणापासूनच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला होता, लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.

5/5

नुकताच त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा पंतप्रधान मोदी (PM Modi) याना काही मोलाचे शब्द सुद्धा सांगितले होते त्या ,म्हणाल्या होत्या . ''काम करो बुद्धी से जीवन जियो शुद्धी से ''  त्यांच्या जाण्याने पंतप्रधानांच्या आयुष्यात खूप मोठं नुकसान झालं आहे शेवटी माणूस कितीही मोठा होवो आईशिवाय तो कमीच असतो हे मात्र नक्की...