राज्यातील ST चा गुजरात पॅटर्न विकास? गुजरात दौऱ्यात परिवहन मंत्री म्हणाले, 'कमी किंमतीत...'

Maharashtra To Fallow Gujarat For State Road Transport Corporation: राज्य परिवहन महामंडळाचे काही अधिकारीही या अभ्यास दौऱ्यामध्ये परिवहन मंत्र्यांबरोबर गेले होते. या दौऱ्यात घडलं काय जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Feb 18, 2025, 12:13 PM IST
1/13

gsrtc

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री गुजरातच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातील काही खास फोटो आणि तेथे काय घडलं, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री काय म्हणाले पाहूयात...

2/13

gsrtc

बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी " व्यापारी संकुल "  आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी - सुविधा युक्त असलेले " बसपोर्ट " निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर  मिलाफ केला आहे. असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.  

3/13

gsrtc

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. तिथेच गांधीनगरमध्ये गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.   

4/13

gsrtc

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक)  व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक  यंत्र ) दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी झाले आहेत.  

5/13

gsrtc

या दौऱ्यादरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली.   

6/13

gsrtc

या  बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा  करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली.  

7/13

gsrtc

त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली ( command control system) अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे, असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.  

8/13

gsrtc

यावेळी गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली.  

9/13

gsrtc

यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली.  

10/13

gsrtc

विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा  विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना " प्रवासी विश्रांतीगृह " कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले.  

11/13

gsrtc

तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली.

12/13

gsrtc

पंतप्रधान ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी करण्यात आलेली.  

13/13

gsrtc

इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का! याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.