'माझ्या प्रेयसीचं जबरदस्ती लग्न लावलं जात आहे, काय करु?'; प्रेमानंद महाराजांना तरुणाचा प्रश्न, म्हणाले 'खोट्या...'

नुकतंच वृंदावनमधील प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराज यांच्याकडे एक तरुण आपली व्यथा घेऊन पोहोचला होता. त्याने सांगितलं, 'मी जिच्याशी प्रेम करतो तिचं आज लग्न आहे. ती आपल्या आई-वडिलांचा दबाव आणि सामाजिक कारणांमुळे लग्न करत आहे'.  

Shivraj Yadav | Feb 13, 2025, 21:40 PM IST

नुकतंच वृंदावनमधील प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराज यांच्याकडे एक तरुण आपली व्यथा घेऊन पोहोचला होता. त्याने सांगितलं, 'मी जिच्याशी प्रेम करतो तिचं आज लग्न आहे. ती आपल्या आई-वडिलांचा दबाव आणि सामाजिक कारणांमुळे लग्न करत आहे'.

1/9

21 व्या शतकात प्रेमविवाह ही आता सामान्य बाब झाली आहे. पण आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलांचं प्रेम काही ना काही कारणाने स्विकारलं जात नाही.   

2/9

मुलांच्या प्रेमाला नकार देत आई-वडील त्यांच्या इच्छेविरोधात लग्न ठरवून टाकतात.   

3/9

नुकतंच वृंदावनमधील प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराज यांच्याकडे एक तरुण हीच व्यथा घेऊन पोहोचला होता. त्याने सांगितलं, 'मी जिच्याशी प्रेम करतो तिचं आज लग्न आहे. ती आपल्या आई-वडिलांचा दबाव आणि सामाजिक कारणांमुळे लग्न करत आहे'.  

4/9

आपण आता काय करावं? असा प्रश्न त्याने प्रेमानंद महाराज यांना विचारला. त्यावर त्यांनी एखाद्याचं जबरदस्ती लग्न लावलं जाऊ शकतं का? असा प्रश्न विचारला.   

5/9

महाराज म्हणाले, "जर तुम्ही तिच्यावर प्रेम केलं, पण ती तुम्हाला पसंत करत नसेल तर अशा स्थितीत तुम्ही तिला तिच्या आवडीचा मुलगा मिळाला यासाठी देवाकडे ती आनंदी राहावी अशी प्रार्थना करावी".  

6/9

त्यांनी पुढे सांगितलं की, "पण जर प्रेम असेल तर कोणी जबरदस्ती लग्न लावू शकत नाही. दबावात आपलं प्रेम सोडून दुसऱ्याशी लग्न करणं योग्य नाही. असं होऊ शकत नाही".  

7/9

महाराजांनी यमुनाचं उदाहरण देत समजावलं की, "जर पूर आला असता यमुनेच्या पाण्यावर दबाव आला तर यमुना सारे दबाव तोडून पुढे जाते".  

8/9

त्यामुळे जिथे प्रेम असेल तिथे कोणत्याही प्रकाराचा दबाव असू शकत नाही. प्रेमानंद महाराज म्हणाले, "प्रेम कोणाचा दबाव मानत नाही. आणि जर मानत असाल तर ते प्रेम नाही".  

9/9

"खोट्या प्रेमासाठी रडून आणि दु:ख करुन काही फायदा नाही. रडायचं असेल तर देवासाठी रडा आणि त्याच्यावर प्रेम करा. देवाच्या नावाचा जप करा," असं त्यांनी सांगितलं.