पांढरे तीळ, गुजरातचं मीठ, चांदीचा नारळ अन्... मोदींनी बायडेन यांना का भेट दिल्या 'या' 10 गोष्टी?

Modi Special Presents To President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांना खास भेटवस्तू दिल्या. मात्र पंतप्रधानांनी दिलेल्या एका चंदनाच्या पेटीमधील काही खास गोष्टींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या गोष्टी मोदींनी बायडेन दांपत्याला का भेट दिल्या याबद्दलची माहितीही समजावून सांगितलं. यावेळेस अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झील बायडेन सुद्धा मोदींचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. या भेटवस्तू काय आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे पाहूयात...

| Jun 22, 2023, 09:59 AM IST
1/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीचा नारळ, गुजरातचं मीठ, पांढरे तिळ, सोन्याचं नाणं, चांदीचं नाणं, चंदन अशा गोष्टी भेट दिल्या आहेत. मात्र जगातील महासत्तेतच्या सर्वोच्च नेत्याला या गोष्टी भेट देण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

2/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली.  

3/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

मोदी आणि जो बायडेन यांच्या भेटीच्या वेळेस अमेरिकेच्या फार्स्ट लेडी जिल बायडन ही उपस्थित होत्या.

4/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

पंतप्रधान मोदींनी यावेळेस जो बायडेन यांना एक खास भेट दिली असून यामध्ये अगदी पांढऱ्या तिळांचाही समावेश आहे. ही भेट काय आहे आणि त्याचा अर्थ काय समजून घेऊयात आणि या भेटवस्तूंचे फोटोही पाहूयात...

5/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना भेट दिलेल्या गोष्टींमध्ये एका चंदनाच्या पेटीचाही समावेश असून त्या आतमध्ये काही खास गोष्टीही आहेत.

6/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

चंदनाची ही पेटी राजस्थानमधील जयपूर येथील कारगिरांनी खास बायडेन यांच्यासाठी तयार केली आहे. बायडेन यांना दिलेल्या या पेटीमध्ये मैसूरमधील चंदन असल्याची माहिती देण्यात आली आहे.

7/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

चंदनाच्या या पेटीमध्ये गणपतीची मुर्तीही आहे. गणपती हा सर्व अडथळे दूर करणारा आणि सर्वात आधी पूजा केला जाणारा देव असल्याने गणेशाची मूर्ती देण्यात आली आहे.

8/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

कोलकात्यामध्ये मागील 5 पिढ्यांपासून धातूच्या मूर्ती बनवण्याचं काम करणाऱ्या कारागिरांकडून ही मूर्ती बनवून घेण्यात आली आहे. 

9/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

तसेच बायडन यांना देण्यात आलेल्या चंदनाच्या पेटीमध्ये दिवाही आहे. प्रत्येक हिंदू घरामध्ये आवर्जून असलेली गोष्ट म्हणजे दिवा. हा चांदीचा दिवा कोलकात्यामध्ये मागील 5 पिढ्यांपासून चांदीचं काम करणाऱ्या कारागिरांकडून बनवून घेतला आहे.

10/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

सहस्त्र पूर्ण चंद्रोदय साजरा करताना दहा वेगवेगळ्या गोष्टी भेट देण्याची परंपरा दास दानम या पश्चिम बंगालमधील पद्धतीत असते. यात गौदान, भूदान, तिळदान, हिरण्यदान, अजयदान, धान्यदान, वस्त्रदान, गुडदान, रुपयादन आणि लवणदानाचा समावेश असतो. हे सर्व मोदींनी बायडेन दांपत्याला समजावूनही सांगितलं.

11/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना दिलेल्या चंदनाच्या पेटीमध्ये या सर्व दानांचं प्रातिनिधिक स्वरुप असल्याचं दिसून येत आहे. 

12/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

यामध्ये चांदीचा एक छोटा नारळही आहे. हा नारळ पश्चिम बंगालमधील कारागिरांनी तयार केला असून तो गौदानाचं प्रतिक म्हणून देण्यात आला आहे.

13/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

भूदान म्हणून मैसूरमधील चंदन बायडेन यांना भेट देण्यात आलं आहे.

14/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

तामिळनाडूमधील पांढरे तिळही बायडेन यांना देण्यात आले आहे. तिळदानाचं प्रतिक म्हणून हे पांढरे तिळ दिले आहेत.

15/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

हिरण्यदान म्हणजेच सोनं दानासाठी राजस्थानमधील कारागिरांनी साकारलेलं सोन्याचं नाणंही देण्यात आलं आहे. हे 24 कॅरेट सोन्याचं नाणं आहे.

16/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

या चंदनाच्या पेटीमध्ये चांदी दानासाठी 99.5 टक्के शुद्ध अशा चांदीचं नाणही बायडन यांना देण्यात आलं आहे. हे नाणं राजस्थानमधील कारागिरांनी साकारलं आहे.

17/17

Prime Minister Narendra Modi presents a special sandalwood box to US President Joe Biden

तसेच लवणदान म्हणून गुजरातमधील मीठही या चंदनाच्या पेटीमध्ये बायडन यांना देण्यात आलं आहे.