छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला; इथं इतका मोठा खजिना सापडला होता की...

Shiv Jayanti 2025 : तोरणा किल्ल्यावरच स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेठ रोवली गेली. जाणून घेवूया या किल्ल्याचा इतिहास. 

वनिता कांबळे | Feb 18, 2025, 19:11 PM IST

Pune Torna Fort  : पुणे जिल्ह्यातील  तोरणा किल्ला हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यावेळेस त्यांच्याच वयाचे मावळे  तोरणा किल्ला सर करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. या किल्ल्यावर महाराजांना मोठा खजिना सापडला होता. 

 

1/7

महाराष्ट्रातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहे. तुम्हाला माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा महाराज किती वर्षांचे होते. 

2/7

तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे आहे.  पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे स्टेशनला उतरुन देखील येथे जाता येते.  

3/7

तोरणा किल्ल्यावरून राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला हे किल्ले देखील दिसतात.  ऐतिहासिक असा बिनी दरवाजा हे तोरणा किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.    

4/7

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 1400 मीटर उंचीवर  तोरणा  किल्ला वसलेला आहे.  तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो.  

5/7

 तोरणा किल्ला महाराजांसाठी धनलक्ष्मी ठरला. या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी सापडल्या. राजगड किल्ल्याच्या निर्मीतीसाठी या धनलक्ष्मीचा वापर करण्यात आल्याचे संशोधक सांगतात. 

6/7

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण किल्ला काबीज केला. 

7/7

तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेला पहिला किल्ला आहे.