झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवताय, आजच ही सवय बदला... लैंगिक क्षमतेवर होईल परिणाम?

मोबाईल मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक आहेत असे संशोधनातून आढळले आहे. डोक्याजवळ मोबाईल ठेऊन झोपल्यास कॅन्सर सारखा असाध्य रोगही होऊ शकतो असे तज्ञ्जांचे म्हणणे आहे. डोके दुखणे, शरीरातील मासपेश्या दुखणे, झोप नीट न होणे, चिडचिड होणे, लैंगिक क्षमता कमी होणे असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे झोपताना मोबाईल जवळ ठेऊच नये असा सल्ला तज्ञ्जांनी दिलाय.

May 01, 2023, 17:59 PM IST
1/7

WHO has warned about cancer due to excessive use of mobile phones

मोबाईलच्या अति वापरावरुन जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाबद्दल इशारा दिला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईलच्या आहारी गेले आहेत.    

2/7

Smartphones are prone to charging while sleeping at night

अनेक जण स्मार्टफोन रात्री झोपताना डोक्याजळ चार्जिंगला लावतात. झोपेपर्यंत मोबाईल अनेकांच्या हातात असतो आणि मग तो तसाच राहतो. त्याच्यातून निघणारे रेडिएशन अतिशय घातक आहेत.

3/7

Keeping a mobile on a pillow is very dangerous

मोबाईल उशाला ठेवणे हे अतिशय धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत तज्ञ्जांनीही याबाबत इशारा दिला आहे, अशी माहिती बालरोग तज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी दिली आहे.

4/7

mobile phone radiation decision making ability of children is reduced

मोबाईलच्या रेडिएशनमुळे लहान मुलांची निर्णयक्षमता कमी होत असल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या डोळ्यांचा नंबर वाढत आहे. डोकेदुखी, मायग्रेनसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.

5/7

erectile dysfunction

मोबाईलच्या रेडिएशनमुळे पुरुषांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता ही मोबाईलच्या अति वापरामुळे किंवा रेडिएशनमुळे आली आहे. यासोबत डोकेदुखी, स्नायूदुखी आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे कारणही मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहे.

6/7

mobile charging

यामुळे मुलांमध्ये, महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे ज्या खोलीमध्ये आपण झोपतो तिथे मोबाईल चार्जिंगला लावू नये. रात्री झोपण्यापूर्वी शेजराच्या खोलीत चार्जिंगला लावावा.

7/7

Mobile distance while sleeping

त्यामुळे झोपताना मोबाईलमध्ये आणि तुमच्यामध्ये कमीत कमी दहा फुटांचे अंतर असायला हवं. यामुळे तुम्ही मोबाईलच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फील्ड आणि धोकादायक रेडिएशनपासून दूर राहाल.