राहुल गांधी यांनी समुद्रात उडी मारली आणि...

Feb 24, 2021, 21:53 PM IST
1/5

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी फार मोठं धाडस करुन समुद्रात उडी घेतली आणि त्यांच्या आजबाजूला असणाऱ्या सुरक्षा रक्षकासह कोळ्यांची भंबेरी उडाली. राहुल गांधी सध्या केरळमधील कोलममध्ये आहेत.

2/5

मच्छिमारांच्या मासेमारीचा अनुभव घेण्यासाठी राहुल गांधी हे नावेतून प्रवास करत होते. यावेळी राहुल गांधी यांनी खाकीरंगाची लांबपॅन्ट आणि निळा टीशर्ट घातला होता, राहुल गांधी यांच्यासमोर अनेक मच्छिमार जाळं पसरवण्यासाठी पाण्यात उड्या मारत होते.

3/5

हे दृश्य पाहून राहुल गांधी यांना कदाचित राहावलं नसेल, तेव्हा राहुल गांधी यांनी थेट निळ्याशार समुद्रात अचानक उडी घेतली. राहुल गांधी यांनी समुद्रात उडी मारल्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक अवाक झाले, तर मच्छिमारांना आरडाओरड केली की, हे काय, काही मच्छिमार राहुल गांधी यांच्या आजूबाजूला गेले, पण ते आणखी अवाक झाले कारण राहुल गांधी हे लीलया पोहत होते.

4/5

राहुल गांधी एका निष्णात जलतरणपटूसारखे पोहत होते, तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या आणि गोंधळलेल्या मच्छिमारांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. कुणाला काहीही न सांगताच अचानक राहुल गांधी यांनी समुद्रात उडी मारल्याने सर्वच बिथरले होते, पण राहुल गांधी हे समुद्रात छान पोहत असल्याचं पाहुन मच्छिमारांनाही आनंद झाला.

5/5

राहुल गांधी यांनी समुद्रात फक्त उडी घेऊन ते बाहेर आले नाहीत, तर ते जवळजवळ १० मिनिटं समुद्रात पोहत होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी अंगातील ओले कपडे बदलले. या दरम्यान यापूर्वीच्या अडीच तासाच्या प्रवासात राहुल गांधी यांनी नावेतच मच्छिमारांसोबत फिशकरी बनवली आणि त्याचा आस्वाद घेतला. मच्छिमारी करणाऱ्यांचं आयुष्य अनुभवायचं होतं असा यामागे त्यांचा उद्देश होता.